भिवंडी: भिवंडी-नाशिक मार्गावरील पोगाव पाईपलाईन येथे फिरावयास गेलेल्या प्रेमीयुगूलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीणीवर पाचजणांनी अत्याचार केल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली. घटनास्थळी असलेल्या मातीवरील पाऊलखुणांनी पोलीसांनी आज रोजी आरोपींना गजाआड केले.शहरातील आझादनगर येथे रहाणारा इम्रान सिकंदर खान(२६) हा आपल्या वीस वर्षाच्या मैत्रीणीस घेऊन काल सायंकाळी दुचाकीने पोगाव पाईपलाईन येथे फिरण्यास गेला होता. रात्री साडेनऊ वाजता ते दोघे घरी जाण्यास निघाले असता त्यांना पाच जणांनी रस्त्यात अडविले. तसेच सिकंदर याच्या डोक्याला गावठी कट्टा व चाकू लावला. त्यांना दोघांना पाईपलाईनच्या आडोशाला नेऊन त्याच्या सोबत असलेल्या मैत्रीणीवर त्या पाच जणांनी आळीपाळीने पाशवी अत्याचार केला आणि तेथून ते पाचजण पळून गेले. या अचानक घडलेल्या घटनेने भयभीत झालेल्या इम्रान खान याने आपल्या मैत्रीणीसोबत तालुका पोलीस ठाणे गाठले. दोघांनी पोलीसांना घडलेला प्रकार सांगीतला. या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास चौघुले हे आपल्या पथकासह घटनास्थळी गेले. तेथे पाईपलाईनच्या मातीच्या भरावावर असलेल्या पाऊलखुणांचा पंचनामा करीत परिसरांत शोध घेतला. तेंव्हा किशोर रघुनाथ लाखात(१९)याचे नाव पुढे आले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पाच जणांनी मिळून अत्याचार केल्याचे कबूल केले. उरलेल्या गुरूनाथ गोपाल बारी(२३)यास येवई गावातून अटक केली. तर हर्षद हिरामण मटले(१९)यांस चाविंद्रा गावातून अटक केली तसेच अविनाश पुंडलीक जाधव(२४)व गणेश पवार(२०)या दोघांना शेलार गावातून अटक केली. पोलीसांनी या प्रकरणी पाच आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना आज बुधवार रोजी कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने ग्रामिण भागात खळबळ माजली असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.
मातीवर उमटललेल्या पाऊलखुणाने अत्याचार करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 8:40 PM
भिवंडी : भिवंडी -नाशिक मार्गावरील पोगाव पाईपलाईन येथे फिरावयास गेलेल्या प्रेमीयुगूलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीणीवर पाचजणांनी अत्याचार ...
ठळक मुद्देपोगाव पाईपलाईन येथे फिरावयास गेलेल्या प्रेमीयुगूलास दाखविला चाकूचा धाकमहिलेस बाजूला मातीच्या ढिगा-यावर नेऊन केला अत्याचारमातीच्या ढिगा-यावरील पाऊलखुणाने पाच आरोपी गजाआड