- अजित मांडके ठाणे : ठाणे शहर पोलीस भरती २०२२-२३ दरम्यान साकेत पोलीस मैदान या ठिकाणी मैदानी चाचणी दरम्यान सातारा येथील उमेदवार साहील सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित असलेले औषध Tab Jefcort 6 Mg चे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याच्या विरोधात बीएनएस कायदा कलम २२३, सह औषीधीद्रव्य व सौदर्य प्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८ (सी), २७ अन्वये राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे शहर आयुक्तालय पोलीस भरती २०२२-२०२३ ची मैदानी चाचणी साकेत पोलीस मैदान या ठिकाणी १९ जून २०२४ रोजी पासुन सुरू झाली आहे. १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. सदरची प्रक्रिया चालु झाली असता सकाळी ०७:४५ वाजता डिटेल क्र. १६२० त्यामधील चेस्ट क्रमांक १६०११ ते १६०२० या डिटेलवर इन्चार्च असलेल्या महिला पोलीस हवालदार साबळे यांनी संपूर्ण डिटेलला मैदानी चाचणीसाठी घेवुन जात असताना, चेस्ट क्र. १६०११ व १६०१२ या दोन उमेदवाराना वॉशरूम साठी सोडले असता त्यांच्या पैकी चेस्ट क्र. १६०११ साहील सानप यांने कोणतीतरी गोळी खाल्ली असल्याचे त्याच्यासोबत असलेल्या उमेदवार याने डिटेल इंन्चार्ज यांच्या निदर्शनास आणुन दिले होते. त्यानुसार उमेदवार सानप याला त्याबाबत विचारले असता 'अंगात कणकण येत असल्याने त्याने गावाकडुन मेडीकल मधुन आणलेली अंगदुखीची गोळी खाल्याचे सांगीतले'.
पंरतु त्याबदद्ल पोलीस हवालदार साबळे यांना संशय आल्याने त्यांनी सहायक पोलीस आयुक्त अरूण पाटील यांना माहिती दिली. त्यांनी चेस्ट क्र. १६०१२ याच्यासोबत पोलीस हवालदार सुभाष थोरात यांना पाठवुन चेस्ट क्र. १६०११ याला जी गोळी खाल्ली होती. त्या गोळीचे नाव असलेले रॅपर शोधुन काढले. त्या रॅपरचे / गोळीचे नाव Tab Jefcort 6 Mg असे असल्याचे दिसुन आल्यावर त्या गोळी बाबत पोलीस भरती मैदानावरील उपस्थित असलेले डॉ. शशिकांत भागवत यांना सदरचे रॅपर दाखवुन विचारले असता, त्यांनी ते प्रतिबंधीत ड्रग असल्याचे सांगितले. त्यानुसार सानप याच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक डाके करत आहे.