शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

मोर्वा गावातील कांदळवन तोडून बांधकाम केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 8:15 PM

लोकमतने बुधवारीच मोर्वा, राई, मुर्धा भागात सरकारी जमिनींवरील कांदळवन तोडून बांधकामे होत असल्याचे वृत्त दिले होते.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या मोर्वा गावातील सरकारी जागा हडप करणाऱ्या आणि कांदळवन तोडून बांधकाम करणाऱ्या  तिघा  माफियांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने हा गुन्हा दाखल केला असून या ठिकाणी केलेले बांधकामसुद्धा तोडण्यात आले आहे. लोकमतने बुधवारीच मोर्वा, राई, मुर्धा भागात सरकारी जमिनींवरील कांदळवन तोडून बांधकामे होत असल्याचे वृत्त दिले होते.मोर्वा गावात खाडी किनारी असलेल्या बामण देव नगर भागात सरकारी जागा असुन काही माफिया प्रवृत्ती सरकारी जागा बळकावून त्यावर बांधकामे करून विक्री वा भाड्याने देण्याचे प्रकार करतात. त्यासाठी येथील मोठमोठी कांदळवनाची झाडे तोडली जातात. झाडे तोडून तेथे भराव करुन बांधकामे केली जातात.बामणदेव नगर येथे कांदळवन तोडुन भराव करुन खोल्या बांधण्यासाठी पायाचे बांधकाम केल्या प्रकरणी भूमाफिया पिंटु सिंगसह जयवंत किणी आणि जितेंद्र किणी यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात विविध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी सदर गुन्हा दाखल केला असून यादव यांनी पालिका पथकासह सदर पायाचे बांधकाम देखील तोडून टाकले आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या आदेशानंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली.