प्रशांत माने कल्याण : कल्याण परिमंडळ ३ च्या परिक्षेत्रात चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. सोनसाखळी, घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. एकीकडे चोरांच्या नावाने पोलीस शिमगा करत असताना दुसरीकडे मात्र चोरांची जोरदार दिवाळी सुरू असल्याचे चित्र आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलीस पुरते हतबल झाले असून या चोरट्यांना वेसण घालायचे तरी कसे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे.एरव्ही एकट्या-दुकट्या महिला हेरून त्यांच्या गळ््यातील सोन्याचे ऐवज लांबवण्याचे प्रकार घडत होते, परंतु आता सर्रासपणे रहदारीच्या ठिकाणीही महिलांचे ऐवज लंपास करण्याचे प्रकार मोटारसायकलवरील चोरट्यांकडून सुरू आहेत. मॉर्निंग वॉकला जाणाºया महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. पतीसमवेत वॉक घेणाºया महिलेसही लुटण्यात आले. मागील चार दिवसांत अशा दोन घटना घडल्या आहेत. सर्वसाधारणपणे महिलांच्या गळ््यातील ऐवज खेचून पलायन केले जात असत. परंतु, कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी हद्दीत भल्या पहाटे जॉगिंग करता घराबाहेर पडलेल्या उमेश कदम यांच्या गळ््यातील सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना नुकतीच घडली आहे. रिक्षातून प्रवास करणाºया प्रवाशांवरही या चोरट्यांचा ‘वॉच’ असून रिक्षातील महिला प्रवाशांच्या हातातील पर्स खेचून पोबारा करण्याचे प्रकारही सर्रास घडू लागले आहे. खडकपाडा आणि मानपाडा परिसरात या घटना घडल्या आहेत.एकंदरीतच मागील १० दिवसांत सोनसाखळी चोरीच्या १४ घटना घडल्या आहेत. दोन घटनांमध्ये पर्स लंपास लांबवण्यात आल्या आहेत. या चोरीच्या घटनांमध्ये आंबिवलीतील इराणींचा विशेषत: अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, त्यांना कायमस्वरूपी वेसण घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करूनही त्यांच्याकडून चोरीचे प्रकार सुरूच आहेत. चोरीच्या घटनांमध्ये कायदेही तकलादू ठरत असल्याने याचा फायदा आपसूकच चोरट्यांना होत आहे. यात चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यावर पोलिसांनाही मर्यादा येत आहेत.घरफोडीच्या घटनांनीही पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.मागील १० दिवसांत घरफ ोडीच्या आठ घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ््या घरफोड्या वाढल्या आहेत. रामनगरमध्ये अंजली घाडीगावकर या महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळ््या घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला. घरात घुसलेल्या चोरट्याकडून अंजली यांच्या १४ वर्षांचा मुलगा प्रणव याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्याचवेळी कामावरून घरी परतलेल्या अंजली यांनी आरडाओरडा केल्याने प्रणव याचे प्राण वाचले. शेजारी राहणाºया रहिवाशांनी पळणाºया चोरट्याला बेदम चोप देत रामनगर पोलिसांच्या हवाली केले. सहसा बंद असलेली घरे लक्ष्य केली जात असताना उघड्या दरवाज्यावाटे वस्तू लांबवण्याचे प्रकारही सुरू आहेत.
पोलिसांचा शिमगा अन् चोरांची दिवाळी...! सोनसाखळी, घरफोडी व वाहनचोरीचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:11 AM