ठाणे : पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य सांभाळून कुटुंबीयांकडे आणि स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी कर्मचाऱ्यांना दिला. पोलीस कल्याण सप्ताहानिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाणे ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी १ ते ८ जून २०१९ दरम्यान ‘पोलीस कल्याण सप्ताह’ झाला. त्याचा सांगता सोहळा ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या वित्तक सभागृहात ८ जून रोजी पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. राठोड यांनी पोलीस वेल्फेअर या शब्दाची व्याप्ती विशद करुन भविष्यात पोलीस कल्याणासाठी चांगल्या योजना कशा राबविता येतील, याची माहिती दिली. आपल्या कामाची सांगड घालतांना कुटूंबियांकडेही कर्मचाºयांनी कसा वेळ दिला पाहिजे, व्यायामाकडे लक्ष देऊन आरोग्य चांगले कसे राहील, याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग एकच्या पदावर निवड झालेल्या राखीव पोलीस उपनिरीक्षक चतरसिंग सोळंकी यांची कन्या आयेशा हिचा तसेच तिच्या पालकांचा डॉ. राठोड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आयेशा हिच्यासह दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परिक्षांमध्ये तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या ४१ पोलीस पाल्यांचाही यावेळी सत्कार करण्यत आला. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबिय यावेळी उपस्थित होते.............................११ ठाणे पोलीस सत्कार