शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आठ पोलिसांच्या हत्याकांडातील विकास दुबेच्या साथीदारांना पोलिसांनी नेले अखेर हवाई प्रवासाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:44 AM

कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.

ठळक मुद्देभाजीच्या ट्रकने झाले होते पळूनएन्काऊंटरची व्यक्त केली होती भीती

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एन्काऊंटर आणि अपघाताची भीती व्यक्त केल्याने हवाई प्रवासाची मागणी केलेल्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले.मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठाण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांची ट्रान्झिस्ट रिमांड मिळवून दोघांनाही कानपूरला नेल्याची माहिती मुंबई एटीएसने ‘लोकमत’ला दिली.दोघांच्याही जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हवाईमार्गे नेण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली होती.विकास दुबे उत्तरप्रदेश पोलिसांबरोबर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याचे अरविंद आणि सोनू हे दोन साथीदार एन्काऊंटर होण्याच्या भीतीने ठाण्यात पळून आले होते. अरविंद हा विकासचा खास हस्तक मानला जातो. त्याचा चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडात थेट संबंध असल्याची माहिती सोमवारीच उत्तरप्रदेशच्या (यूपी) पोलिसांनी ठाणे न्यायालयाला दिली. यापूर्वीही त्याच्यावर यूपीमध्ये खूनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांच्या हत्याकांडानंतर फरार झाल्यानंतर अरविंदची माहिती देणाऱ्यावर तसेच त्याला पकडण्यासाठी युपी पोलिसांनी ५० हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते, अशी माहिती एटीएसचे पोलीस निरिक्षक दया नायक यांनी दिली. अरविंद हा आपला वाहन चालक सोनू त्रिवेदीसह ठाण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला नायक यांच्या पथकाने शनिवारी अटक केली. या दोघांनाही २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही घेण्यासाठी आलेल्या कानपूर (यूपी) पोलिसांकडे सक्षम व्यवस्था नसल्याचे तसेच अपघातासह एन्काऊंटरची भीतीही त्यांनी ठाणे न्यायालयात व्यक्त केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता त्यांना हवाईमार्गे घेऊन जाण्याची मागणी आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. आरोपींची ही मागणी मान्य झाल्यामुळे तसेच त्यांना विमानाने नेण्याची तयारी यूपी पोलिसांनी दर्शविल्यामुळे तशी अनुमती सोमवारीच न्यायालयाने दिली. दरम्यान, या दोघांचाही कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे तळोजा कारागृहातून त्यांना मंगळवारी सकाळी बाहेर काढल्यानंतर १४ जुलै रोजी दुपारी १.५५ वा. च्या एका खासगी एअरलाईन्सने त्यांना मुंबईतून लखनौ येथे नेल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.असा झाला प्रवास...कानपूरच्या बकारु गावात ३ जुलै रोजी चौबेपूर पोलीस ठाण्याच्या आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर विकास दुबेसह त्याचे साथीदारही पसार झाले होते. अटकेच्या भीतीने अरविंद आणि सोनू हे दोघांनी पलायन केले होते. ते ४ जुलै रोजी पहाटे महाराष्ट्राच्या सीमेवरील दतिया या गावात मित्राच्या घरी थांबले. तिथेच त्यांना विकास दुबेच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर तिथून एका टूरिस्ट टॅक्सीने दोघेही दातिया गावातून ५० ते ६० किमीपर्यंत ५ जुलै रोजी आले. नंतर नाशिकमार्गे ते पुण्यात आले. पुण्यातच मुक्काम करुन त्यांनी दुस-या दिवशी एका भाजीच्या टेम्पोने ६ जुलै रोजी ठाणे गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक