शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

मीरा भाईदरमधील समुद्र-धबधबे आदी पर्यटनस्थळी गेल्यास पोलीस करणार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 2:28 PM

Miraroad News : चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात मौजमजेसाठी गेलेल्या व पाण्यात अडकलेल्या भाईंदरच्या तीन तरुणांना अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी वाचवले होते.

मीरारोड - उत्तन समुद्र किनारी जीवघेणी स्टंटबाजी व गर्दी तसेच चेणे येथे तीन तरुणांना नदी खोऱ्यातून वाचवण्यात आल्याच्या घटनांनंतर मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी हद्दीतील सर्व धबधबे, तलाव, धरणे व इतर पर्यटनस्थळांचे १ कि.मी. परिसरात व समुद्रकिनारी जाण्यास, मद्यपान, सेल्फी, प्रदूषण आदींना कलम १४४ जारी करत मनाई केली आहे. 

पावसाळा सुरू झाला की शहरातील उत्तन समुद्र किनारा, भाईंदर ते घोडबंदरचा खाडी किनारा, चेणे येथील लक्ष्मी नदीपात्र तसेच डोंगरी-उत्तन व चेणे-काजूपाडा व काशीमीरा भागातील लहान मोठे धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु निसर्गाचा निखळ आनंद लुटण्या ऐवजी मद्यपी, व्यसनी व बेजबाबदार उनाडांचा राबता हा ठिकाणी त्रासदायक व जीवघेणा ठरत आला आहे. 

४ जुलै रोजी चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात मौजमजेसाठी गेलेल्या व पाण्यात अडकलेल्या भाईंदरच्या तीन तरुणांना अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी वाचवले होते. वास्तविक या भागात नेहमीच मद्यपी व मौजमजेसाठी येणारे जीव गमावतात वा जीवघेण्या प्रसंगातून वाचवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. तर उत्तन समुद्र किनारी जीवघेण्या लाटा उसळत असताना समुद्रातील खडकावर स्टंटबाजी करणाऱ्या उनाडांना पोलिसांनी पिटाळले होते. 

पोलिसांनी आता अशा घटनांचे गांभीर्य घेत जीवित व वित्त हानी रोहण्यासाठी सर्व धबधबे, तलाव, धरणे व इतर पर्यटनस्थळांचे १ कि.मी. परिसरात व समुद्रकिनारी फौजदारी प्रक्रियाचे कलम १४४ अन्वये पोलीस उपआयुक्त यांनी मनाई आदेश जारी केला आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या तसेच पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्या खाली बसण्यास, सेल्फी वा चित्रीकरण करणे, मद्यपान किंवा मद्यधुंद अवस्थेत जाणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत मद्य विक्री करण्यास बंदी घातली आहे. 

रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, अतिवेगाने चालवणे, ओव्हरटेक करण्यास मनाई केली आहे. खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर फेकणे. मोठ्या आवाजात गाणी - वाद्य, गाडीतील ध्वनी यंत्रणा वा डी .जे. सिस्टीम वाजवण्यावर बंदी असून  ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कारवाई केली जाणार आहे. अशा ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड, अश्लील हावभाव, शेरेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी करवीर केली जाणार आहे. १३ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे मनाई आदेश लागू राहणार असून सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.  वन हद्दीतल्या घुसखोरांवर कठोर कारवाई 

काशीमीराच्या माशाचा पाडा व महाजन वाडी येथील अय्यप्पा मंदिर भागातून तसेच अन्य ठिकाणावरून संजय गांधी राष्ट्रीय वन हद्दीत अनेक जण पावसाळ्यात मौजमजेसाठी घुसखोरी करतात. वन विभाग सह पोलिसांनी या भागात करडी नजर ठेवली आहे. अशा घुसखोरांवर दंडात्मक कारवाई सह वेळ पडल्यास वन कायद्याखाली गुन्हे दाखल केले जातील असा इशारा वन अधिकारी मनोज पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिस