शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेच्या कंटेनर शाखां वरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके

By धीरज परब | Published: November 16, 2023 9:05 PM

पालिकेने कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा कंटेनर ठेऊन पक्ष कार्यालये उघडू असा इशारा त्यांनी दिला आहे .

मीरारोड -  शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते , पदपथ वर ६ ठिकाणी कंटेनर ठेऊन शाखांची उदघाटने आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्या नंतर भाजपा सह शिवसेना ठाकरे गट , मनसे , काँग्रेस आदींनी सदर बेकायदा कंटेनर वर कारवाई करून गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे . पालिकेने कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा कंटेनर ठेऊन पक्ष कार्यालये उघडू असा इशारा त्यांनी दिला आहे .  

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पूर्व भागातील सरस्वती नगर मैदान येथील पोलीस चौकी लगत , नवघर नाका , गोडदेव नाक्या जवळ , गोल्डन नेस्ट सर्कल , इंद्रलोक नाका व मीरारोडच्या पूनम गार्डन भागात सोमवारी एकाच दिवशी ६ कंटेनर शाखांचे उदघाटन केले . यावेळी जिल्हाप्रमुख राजू भोईर सह अनेक माजी नगरसेवक , पदाधिकारी उपस्थित होते .  एकाचवेळी ह्या ६ कंटेनर शाखा रस्ते व पदपथांवर ठेवलेल्या असून त्यांना महापालिकेची व वाहतूक पोलिसांची कोणतीच परवानगी नसताना अतिक्रमण असल्याचा आरोप भाजपा सह शिवसेना ठाकरे गट, मनसे व काँग्रेसने केला आहे .

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी गटनेत्या नीलम ढवण , माजी उपमहापौर प्रवीण पाटील आदींसह मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत , युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप काकडे, जिल्हाध्यक्ष  सिद्धेश राणे, प्रवक्ते रवी खरात , सुशन शेट्टी, दिपक बागरी आदींनी पालिका अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन रस्ते - पदपथ वरील ह्या बेकायदा कंटेनर शाखा हटवा अशी मागणी केली .  पालिकेने जर ह्या कंटेनर शाखा हटवला नाहीत तर त्या ठिकाणी मनसे सुद्धा आपल्या शाखा सुरु करेल असा इशारा मनसेचे हेमंत सावंत , संदीप राणे आदींनी दिला आहे . भाजपाचे माजी नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी देखील सदर कंटेनर शाखा रस्ते - पदपथावर उभारणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे . कंटेनर शाखां मुळे ऐन दिवाळीत राजकीय फटाकेबाजी सुरु झाली आहे. तर राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. 

ध्रुवकिशोर पाटील - (माजी भाजपा नगरसेवक ) - रस्ते - पदपथांवर लोकांची अडचण करून शाखा उभारणे संयुक्तिक नाही. आमदार प्रताप सरनाईक हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनी रीतसर परवानगी घेऊन शाखा उभारणे अपेक्षित आहे.

किशोर शर्मा ( जिल्हाध्यक्ष - भाजपा ) - हा प्रकार चुकीचा असून उद्या सर्वच राजकीय पक्ष असे रस्ते - पदपथांवर कार्यालये उघडतील. या बाबत महापालिका आयुक्तां कडे तक्रार करणार आहोत.

हेमंत सावंत ( मनसे शहर अध्यक्ष ) - ह्या विरोधात महापालिके कडे लेखी तक्रार केली आहे. आधीच शहरातील रस्ते - पदपथ अरुंद असून त्यात फेरीवाले, वाहन पार्किंग आदी मुळे वाहतूक कोंडी होऊन लोकांना चालणे शक्य होत नाही. पालिकेने कारवाई केली नाही तर मनसे सुद्धा त्या शेजारी शाखा सुरू करेल. 

आमदार प्रताप सरनाईक - आपण शहरात शिवसेनेच्या अनेक शाखा उभारल्या व जुन्या शाखांचे पुनर्निर्माण केले. वातावरण बिघडू नये व वाद होऊ नये म्हणून सुरवाती पासून काळजी घेत शाखांवर दावा केला नाही हि माझी चूक झाली का ?  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ह्या शाखां मधून जनतेची कामे व्हावीत यासाठी त्या सुरु केल्या आहेत . शहरात तशी अनेक पक्ष कार्यालये अनधिकृत आहेत . स्वतःची अनधिकृत पक्ष कार्यालये चालतात पण शिवसेनेच्या शाखा का नको ?  कारवाई करायची तर सर्वांवर करावी . अनैतिक धंदे चालणाऱ्या लेडीज बार , लॉज पासून आरक्षित भूखंडवर अतिक्रमण, रस्त्यावरील हातगाड्यां कडून हप्ते मिळतात म्हणून गप्प बसायचे व शिवसेना शाखां विरुद्ध बोंबा मरणाऱ्यांना जनताच उत्तर देईल .