शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

राजकीय नेत्यांची पत्रकबाजी

By admin | Published: October 21, 2015 3:11 AM

कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी तूर्तास मौन बाळगले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र सहानुभूती आणि पत्रकबाजी

ठाणे : कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी तूर्तास मौन बाळगले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र सहानुभूती आणि पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे. परमार यांनी आत्मेहत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोट आणि परमार यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या गोल्डन गँगवरील आरोपामुळे ठाणे महापालिकेतील ही गॅग कोण अशी जोरदार चर्चा होण्यास सुरुवात झाली. हे आरोप होत असताना काही राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार ठाणे महापालिकेतील अज्ञात अधिकारी व नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. तसेच हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे वर्ग केला. याप्रकरणी विशेष पथकाची निर्मिती करून पोलिसांनी महापालिकेत जाऊन झाडाझडती घेतली. तर मंगळवारी झालेल्या ठामपा सर्वसाधारण सभेत चक्क साध्या वेषात पोलिसांनी हजेरी लावून कानोसा घेतला.काही राजकीय नेते मंडळीनी बिल्डरांची सहानुभुती मिळवत असताना दुसरीकडे काहींनी जोरदार पत्रकबाजी करण्यास सुरूवात केली. यामागे नेमके त्यांचे काय हित आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. तर परमार यांना झालेल्या त्रास ठाण्यातील अन्य बांधकाम व्यावसायिकांना झाला नसल्याने त्याबाबत अद्यापही तक्रार वा निवेदन सुद्धा पोलिसांकडे आले नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच जर तशी तक्रार आल्यास सखोल चौकशी करून त्रास देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)