मीरारोड - भार्इंदर स्थानकातुन सुटणारी सकाळची ९.०६ ची भार्इंदर - चर्चगेट महिला स्पेशल लोकल १ आॅक्टोबर पासुन बंद करुन ती विरार वरुन सोडल्याने संतप्त महिला प्रवाशांनी आंदोलन केले होते. खासदार राजन विचारे यांनी महिला स्पेशल पुन्हा भार्इंदर वरुन सुरु करण्यासाठी पाठपुरावा चालवला असताना आता भाजपा व काँग्रेसने सुध्दा महिला स्पेशल साठी निवेदने दिली आहेत.१ नोव्हेंबर पासुन भार्इंदर स्थानकातुन सुटणारी ९ . ०६ वा. ची महिला स्पेशल लोकल बंद करण्यात येऊन तीच लोकल आता विरार स्थानकातुन सुरु केली. महिलांची ही लोकप्रिय लोकल बंद केल्याने संतप्त महिलांनी त्याच दिवशी अन्य लोकल सुरु केल्याचे श्रेय घेण्यास आलेल्या भाजपा व सेनेच्या मंडळीना धारेवर धरले होते. सलग दोन दिवस महिलांनी अनुक्रमे भार्इंदर व मीरारोड स्थानकात विरारहुन आलेली लोकल रोखुन धरत संताप व्यक्त केला होता.महिलांच्या आंदोलना मुळे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला स्पेशल पुन्हा भार्इंदर स्थानकातुन सोडण्यात यावी यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे अधिकारयां कडे मागणी करत त्याचा पाठपुरावा चालवला आहे. रेल्वे स्तरावर त्या बद्दल विचार विनीमय सुरु असुन तांत्रिक बाबी पडताळल्या जात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान महिला लोकल भार्इंदर वरुन बंद केल्या नंतर तब्बल दोन महिन्यांनी राजकिय धावाधाव सुरु झाली आहे. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी बुधवारी रेल्वेचे मुख्य आॅपरेशअनल व्यवस्थापक ए. मधुकर रेड्डी यांना भेटुन निवेदन देत महिला लोकल भार्इंदर वरुन सुरु करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले.तर शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेश सरचीटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या सह शिष्टमंडळाने रेल्वेचे उप महाव्यवस्थापक परिक्षित मोहन कुरीया यांची भेट घेऊन महिला स्पेशल सुरु करण्याची मागणी केली. या वेळी माजी विरोधी पक्षनेते प्रमोद सामंत, माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी, शफिक खान आदी सोबत होते. कुरीया यांनी महिला स्पेशल भार्इंदर वरुन पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल व त्या अनुषंगाने निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे सामंत म्हणाले.
भार्इंदर महिला लोकलसाठी राजकीय धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 8:12 PM