डोंबिवली :प्रवाशांना गर्दीच्या वेळेत दिलासा मिळावा, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या फे-यांच्या श्रेयावरून शिवसेना, भाजपा आणि मनसेचे राजकारण रंगले आहे. मध्य रेल्वेने १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. परंतु, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी याआधीच वाढीव फेºयांची घोषणा केली होती. मग, त्यात खासदार शिंदे यांचे योगदान काय, असा सवाल करत हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संताप मोर्चाचे फलित असल्याचा दावा मनसेने केला आहे. तर, भाजपाने ‘लोकमत’मधील १६ सप्टेंबरच्या वृत्ताचा दाखला देत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतून जादा लोकल सोडा, अशी मागणी महाव्यवस्थापकांकडे केली होती. त्यामुळे वाढीव फेºया वाढल्याचे श्रेय घेणारी होर्डिंग्ज भाजपाने शहरात लावली आहेत.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम व शहराध्यक्ष मनोज घरत म्हणाले की, शिंदे हे प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. रेल्वेने २८ सप्टेंबरला जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात १ नोव्हेंबरपासून मुख्य मार्गावर ठाण्यापुढील प्रवाशांना दिलासा मिळणार, असे स्पष्ट नमूद केले होते. मात्र, तरीही शिंदे यांनी केलेला प्रयत्न हा केविलवाणा होता. शिंदे यांच्यासोबत जाणाºया प्रवासी संघटनाही प्रसिद्धीच्या मागे लागल्या का, असा टोला त्यांनी लगावला.
वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयाचे राजकारण; सेना, मनसे, भाजपात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:54 AM