शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कृषी कायद्याआडून राजकारण- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:58 PM

विराेधकांचा अराजक माजवण्याचा प्रयत्न

पालघर : दिल्लीतील आंदोलक शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही त्यांचे नेते हेका सोडण्यास तयार नाहीत. मोदी सरकारला अडचणीत आणून या आंदोलनाआडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असल्याचा आरोप खासदार कपिल पाटील यांनी केला.केंद्राच्या कृषीविषयक कायद्याविषयी जनजागृती व्हावी व शंकांचे निराकरण मिडियाद्वारे व्हावे या दृष्टीने साेमवारी पालघरच्या शासकीय विश्रामगृहात खा. कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सुजित पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील, माजी आमदार पास्कल धनारे, मधुकर पाटील, पुंडलिक भानुशाली आदी उपस्थित होते.  शेतकरी सक्षम व्हावा, त्याचे उत्पन्न दुप्पट व्हावा असा प्रयत्न केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर कृषीखात्यामार्फत सुरू आहे.केंद्राच्या २०१३ चे कृषी बजेट १७ हजार कोटी होते ते आता २०१९-२० चे एक लाख ३४ कोटींचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता असताना बनले होते. तोच कायदा आता देशपातळीवर झाल्यास त्याला विरोध का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जव्हार, मोखाडा या आदिवासीबहुल भागातील आदिवासी बांधवांना शेतातील मोगरा, भाजी, फळेविक्रीची यंत्रणा उभी नसल्याने रस्त्यावर अथवा आठवडाबाजारात विक्री करावी लागते. यावर खा. पाटील समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच भाजप सरकार खाजगीकरणाच्या दिशेने जात अदानी-अंबानीसाठी हे करत असल्याबाबतचे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले.

‘लाेकभावना केंद्रापर्यंत पाेहाेचवू’देशात प्रत्येकाला सुविधा पाहिजेत. परंतु त्या सुविधा निर्माण करण्यासाठी एखादा प्रकल्प आणला की त्याला आपण विरोध करतो. एनराॅन प्रकल्पापासून हे आपण पाहत असून देशात एखाद्याला लीडर व्हायचे असेल तर शंभर माणसे जमवून विरोध दर्शविला की तुम्ही लीडर बनता. सध्या हेच सुरू असून वाढवण बंदराबाबत लोकांचा नेमका का विरोध आहे हे समजून घेताना केंद्र सरकारने काही चांगल्या गोष्टींचा विचार करूनच हा प्रकल्प आणला असेल, असे खासदारांनी सांगून लोकांच्या भावना केंद्रापर्यंत पोहाेचवू, असे स्पष्ट केले.