शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

तारापूरच्या तीन उद्योगांवर प्रदूषण मंडळाची उत्पादन बंदची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 12:50 AM

पर्यावरणाचे कायदे बसविले होते धाब्यावर : सर्वेक्षणानंतर कारवाई सुरु

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील तीन रासायनिक उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तातडीने उत्पादन बंदची कारवाई केली आहे. सदर तिन्ही उद्योगांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या समितीच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दोषी आढळलेल्या उद्योगांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अजून अनेक उद्योगांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे २५० उद्योगांचे सर्वेक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात केले असून त्यामध्ये पर्यावरणाचे नियम व अटी धाब्यावर बसविणाऱ्या उद्योगांवर उत्पादन बंद तर काही उद्योगांवर प्रपोज डायरेक्शनच्या नोटीस बसविण्यात आल्या आहेत. प्लॉट नंबर २१ /२२/ १मधील आरती ड्रग्स लिमिटेड, प्लॉट नंबर टी-८ मधील एम्मार केम इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड तर प्लॉट नंबर एन-८१ मधील दैनिक सरफेस केमिकल प्रा. लिमिटेड या तीन उद्योगांवर उत्पादन बंद, तर सुभाश्री केमिकलला प्रपोज डायरेक्शनची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी चर्चा आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात उद्योगांतील सांडपाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्यांमध्ये केमिकल्स ऑक्सिजन डिमांडचे (सीओडी) प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याने तसेच ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित नसणे, हाय सीओडी व हाय टीडीएसच्या एमफ्लुएंटची वाहतूक करणाऱ्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम न बसविणे, घातक रसायने मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे वेळच्या वेळी न पाठविणे, झिरो डिस्चार्ज कंसेंट असूनही १०० टक्के सांडपाणी रिसायकल न करणे अशा विविध कारणांमुळे या उद्योगांवर वेगवेगळे दोषारोप ठेवून उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली.