शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रदूषण नियंत्रण मंडळ ढिम्मच; दर्पाचा त्रास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:37 AM

रहिवाशांच्या झोपेचे झाले खोबरे

डोंबिवली : खंबाळपाडा येथील प्रदूषणाला भंगारवाला कारणीभूत असल्याचा दावा कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन (कामा) या कारखानदारांच्या संघटनेने केला असतानाच वायुप्रदूषण या भागात कायम आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभर पुन्हा येथे उग्र दर्प सुटल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नसल्याने रहिवाशांच्या रात्रीच्या झोपेचे अक्षरश: खोबरे झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून खंबाळपाडा भागात वायुप्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे. या प्रदूषणामुळे पसरलेल्या दर्पाचा त्रास ठाकुर्ली परिसरातील ९० फुटी रोड परिसरातही जाणवत आहे. दरम्यान, या त्रासाबाबत खंबाळपाडा, भोईरवाडी भागातील स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीकडे तक्रार केल्यानंतर तीन दिवस प्रदूषणाचा त्रास थांबला होता. तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ड्रेनेजवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्याने रंगमिश्रित सांडपाणी नाल्यातून वाहताना आढळून आले. या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी घेतले होते. त्याचा अहवाल येणे अपेक्षित असताना ‘कामा’ने रविवारी प्रसिद्धिपत्रक काढून रंगांनी माखलेल्या गोण्या धुण्याचे काम खंबाळपाडा, भोईरवाडी येथील नाल्यात भंगारवाला धूत असतो. त्यामुळे त्या नाल्यातील पाण्याला विचित्र रंग येत आहे. तोच प्रदूषणाला कारणीभूत असून त्याला सक्त ताकीद दिल्याकडे लक्ष वेधले होते. विशेष बाब म्हणजे ‘कामा’सोबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही होते.दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून सुटलेल्या दर्पामुळे स्थानिक नागरिकांना डोळे जळजळणे, मळमळणे आणि उलट्यांचा त्रासही झाला. कामा संघटनेने केलेला दावा पाहता कारखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांचीही त्याला साथ असल्याचा आरोप रहिवासी काळू कोमास्कर यांनी केला आहे. संबंधित यंत्रणांचा खोटारडेपणा सुरू असून आता तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.रहिवाशांनी घातला घेरावयासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागीय अधिकारी शंकर वाघमारे म्हणाले, संबंधित प्रदूषण नाल्यातील सांडपाण्यामुळे होत नसून ते वायुप्रदूषण आहे. पुन्हा त्रास सुरू झाला असेल तर आमचे अधिकारी घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले होते.सायंकाळीही दर्पाचा त्रास कायम राहिल्याने रहिवाशांनी एकत्र जमा होत कंपनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तेथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी पाठविण्यात आला नव्हता, त्याऐवजी कामा संघटनेच्या एका माजी पदाधिकाºयाला तेथे पाठविल्याने संतप्त रहिवाशांनी त्याला घेराव घालून जाब विचारला. तसेच हा दर्प कुठून येतो, याची शोधमोहीम रहिवाशांकडून सुरू होती.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण