ठाणे : जोगिला तलाव पुनर्जीवित करण्याच्या कामाला वेग आला असून पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्षात तलावात पाणीसाठा सुरू होईल, असा प्रयत्न असल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. तलाव पुनर्जीवित करण्याचे काम सुरू असून शनिवारी आयुक्तांनी पाहणी केली. या पाहणीमध्ये या तलावाला शुद्ध पाण्याचे झरे लागले असून स्वत: आयुक्तांनी यावेळी पाण्याची चव घेतली. तलावात पुन्हा माती जाऊ नये म्हणून एका महिन्याच्या आत गॅबियन वॉलचे काम पूर्ण करण्यात येणार असून संपूर्ण गाळदेखील काढला जाणार आहे. तर डाव्या बाजूने तलावाचे विस्तारीकरण करण्याबरोबरच तलावासमोर डीपी रोडचेही काम करण्यात येणार आहे.
निरीच्या सल्ल्यानंतर या तलावाला पुनर्जीवित करण्याचे काम महापालिका करीत आहे. तलावापर्यंत जाण्यासाठी समोर डीपी रोडचे काम करण्यात येणार असून यात बाधित होणाऱ्या ८० झोपडीधारकांचा बायोमेट्रिक सर्व्हे करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. २४ तास डी वॉटरिंग करूनही पाण्याचा फ्लो जास्त असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. येथे जी शाळा होती, ती एका संस्थेला दिली असून तिच्या मागे असलेल्या १२५ झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी आणि प्रभाग समिती कार्यालय अशी स्वतंत्र इमारत बांधण्याचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दुसºया टप्प्यात अडीच कोटी खर्चदुसºया टप्प्यात तलावाला नवसंजीवनी देण्यासाठीचा आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला असून त्यासाठी अडीच कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. या ठिकाणी पाच हजार ५२५ चौरस मीटरचा भूखंड असून त्यापैकी दोन हजार ६२५ चौ. मीटर जागेवर वॉटरबॉडी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, हा तलाव पुनरु ज्जीवित करण्याचे नियोजन केले असून त्याची खोली चार ते पाच मीटर इतकी केली आहे.पावसाळ्यानंतर होणार सुशोभीकरणप्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावात तलावाचे पुनरु ज्जीवन करण्यासोबतच या ठिकाणी गॅबियन पद्धतीची भिंत आणि गटार बांधणे, छोटा घाट उभारणे, बैठकव्यवस्था, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, प्रसाधनगृह, आवश्यक विद्युतव्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. याचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे.