शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम कूर्मगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 4:13 PM

कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र त्या कामाला गती मिळत नसल्याने आतापर्यंत डोंबिवली परिसरात सुमारे ५० हजार पाइप गॅस कनेक्शन ऐवजी अवघ्या १५०० ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. स्थानिक गावगुंडांच्या दडपशाहीमुळे अनेकदा कामाला अडथळे येत असून दडपशाहीचा फटका विकास कामाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्णत्वास कसा जाणार असा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे ५० हजार लाभ्यार्थ्यांपैकी अवघ्या १५०० जणांनाच मिळाला लाभ स्थानिक दडपशाहीचा फटका

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र त्या कामाला गती मिळत नसल्याने आतापर्यंत डोंबिवली परिसरात सुमारे ५० हजार पाइप गॅस कनेक्शन ऐवजी अवघ्या १५०० ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. स्थानिक गावगुंडांच्या दडपशाहीमुळे अनेकदा कामाला अडथळे येत असून दडपशाहीचा फटका विकास कामाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्णत्वास कसा जाणार असा पेच निर्माण झाला आहे.ज्येष्ठ शिवसैनिक, खासदार श्रीकांत शिंदे यांचे डोंबिवली कार्यालय प्रमुख प्रफुल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, डोंबिवलीत अनेकदा या कामामध्ये अडथळे येतात,ते सोडवण्यासाठी महानगरचे अधिकारी खासदार कार्यालयाशी संपर्क साधतात. त्यामुळे त्यांना आलेली अडचण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी तातडीने जावे लागते. आम्ही स्थानिक नागरिक घटनास्थळी गेल्यावर संबंधित दडपशाही करणारे कोणीही पुढे येत नाहीत. गुरुवारी सकाळीही जिमखाना परिसरात दोन दिवसांपासून काम थांबवण्यात आल्याची माहिती देशमुख यांना मिळाली. त्यानूसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, पण ज्यांनी काम थांबवा असे सांगितले ती व्यक्ती समोर आली नाही, पण अशा अनेक अडथळयांमुळे कामाला वेग मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी जाता येणे शक्य नसले तरी अडचणी सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगर गॅसच्या कामावर त्याचा परिणाम होत असून प्रकल्प लांबणीवर जात आहे.महानगर गॅसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार डोंबिवली परिसरात एकूण १०० कीमी ही लाइन जाणे अपेक्षित आहे, पण आतापर्यंत विविध अडथळयांमुळे केवळ ११ किमीच लाइन टाकण्यात आली आहे. त्यातही ५० हजार ग्राहकांना ही सुविधा मिळणे अपेक्षित असले तरीही आतापर्यंत सुमारे १५०० ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत काम ही २०१९ पर्यंत पूर्णतेला जाणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. गोळवली परिसरात ग्रामपंचायत असतांना महानगर गॅसने विविध कामांसाठी तेव्हा १४ लाख ४१ हजार रुपये भरले होते, पण त्यानंतर आता ती गाव महापालिकेत आली. मात्र तो निधी अद्यापही महापालिकेत वर्ग झालेला नाही.अशाही काही तांत्रिक अडचणी असल्याने कामात अडथळे येतात.कल्याण पूर्वमध्ये चक्कीनाका परिसरात गेल्या आठवडाभरापासून स्थानिक अडथळयांमुळे काम बंद आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर खोदकामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे १ कोटी २६ लाख ३६ हजारांएवढी रक्कम आधीच भरली आहे.पण काम बंद असल्याने ती रक्कम भरुन काही फायदा झाला नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. देशमुख यांना संबंधित अधिका-यांनी अडचण सांगत त्यावर उपाययोजना करण्यासाठी साकडे घातले आहे. तेथे काम बंद असल्याने महानगरच्या अधिका-यांनी देशमुख होम्स परिसरात जेथे काम सुरु करण्यात येणार आहे तेथे तो निधी वळता करावा अशी मागणी महापालिकेला केली असून त्यासंदर्भातील कार्यवाही देखिल प्रलंबित असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली