पालघर : भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पालघरमध्ये केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी तहसीलदार महेश सागर ह्यांच्या समवेत झालेल्या बैठकी मध्ये सकारात्मक तोडगा काढण्यात आला.माकपच्या वतीने आदिवासी, शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सत्ताधारी सरकार विरोधात नाशिक येथे महामुक्काम, नाशिक-मुंबई लॉगमार्च काढण्यात आला होता. ह्या आंदोलनापुढे नमते घेत शासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. मागण्या मान्य होऊनही प्रशासन पातळी वरून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे कारण देत १० आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७ तहसीलदार कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार महेश सागर ह्यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलवूनही ठोस अंमलबजावणीची मागणी करुन आंदोलनकर्त्यांनी पालघरमध्ये पंचायत समिती कार्यालयासमोरच्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करुन रस्त्यातच चुली पेटवून अन्न शिजविले होते. सकाळी काही आंदोलनकर्त्यांच्या तब्येती बिघडल्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणातच आंदोलन सुरू केले होते. ह्यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान लिखित आश्वासना नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.आज पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार महेश सागर, गटविकास अधिकारी डॉ.घोरपडे, नायब तहसीलदार पष्टे, जिल्हा उद्योगअधिकारी भामरे,वन विभागाचे अधिकारी पोळ, संखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे,शिक्षण विभागाचे अधिकारी आणि माकपचे सुनील धानवा,बबलू त्रिवेदी आदींची बैठक पार पडली. ह्यावेळी कुटुंब विभक्त झाल्यानंतर त्यांना दर माणसी नियमाप्रमाणे धान्य पुरवठा केला जाईल,जिल्ह्यात वनहक्क दाव्या संदर्भात पालघर तालुक्याने उत्तम काम केले असून प्रांताधिकाºयांकडील एकूण ४ हजार १४९ दाव्या पैकी ३ हजार ७४१ दावे मंजूर करण्यात आले असून ते जिल्हाधिकाºयाकडे पाठविण्यात आले आहेत.कातकरी समाजाचे वनांतर्गत असलेले घरथान ५२८ दावे मंजूर करून ते वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे.सफाळे प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, काही स्टाफ कडून इंजेक्शन,सलाईन लावणे आदी उपचारासाठी पैशांची मागणी करतात व औषध साठा असूनही बाहेरून औषधें आणण्यास सांगितले जात असल्याच्या तक्र ारी महिलांनी केल्या. ह्यावर वैयक्तिकतक्रारी केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे ह्यांनी सांगितले.ह्यावेळी सोमटा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची रिक्त जागेमुळे रु ग्णांच्या जीवितास निर्माण झालेला धोका, जि.प. चिंचारे शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, विद्यार्थ्यांया गणवेशाचा घोळ, ११ वि १२ वि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची समस्या आदी विषयावरसकारात्मक चर्चा झाल्या नंतरही बैठक संपली.
तहसिलदारांसमवेतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:36 PM