शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

तृतीयपंथींच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल; ‘वरदा’चा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 11:53 PM

वरदा संस्था राज्यभरात ज्ञानदानाचे काम करत असून, तिला एसएनडीटीची मान्यता आहे.

- जान्हवी मोर्येकल्याण : वरदा महिला बहुउद्देशीय संस्थेने पत्रीपूल परिसरातील तृतीयपंथींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले आहे. त्याकरिता त्यांची नुकतीच एक कार्यशाळा घेतली. शिक्षण घेण्यास प्रथम तृतीयपंथी उत्सुक नव्हते. परंतु, संस्थेच्या वरदा जोशी यांनी त्यांचे समुपदेशन केल्यानंतर जवळपास ४० तृतीयपंथींनी शिक्षणाची तयारी दाखवली आहे.वरदा संस्था राज्यभरात ज्ञानदानाचे काम करत असून, तिला एसएनडीटीची मान्यता आहे. आजही तळागाळातील नागरिकांपर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. काही महिलांचे शिक्षण अनेक कारणास्तव अर्धवट राहिले आहे. त्यामुळे त्यांना ते घेता यावे, यासाठी संस्था कार्यरत आहे. कल्याण-डोंबिवलीत ही संस्था २०१३ पासून कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत ३०० महिलांना शिक्षण दिले असून, त्यात १५ नगरसेविकाही आहेत. संस्था आता महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा चौधरी यांच्या सहकार्याने तृतीयपंथींना शिक्षण देणार आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तृतीयपंथींना सर्व अधिकार आहेत. महिला धोरणात शैक्षणिक अधिकार, कौशल्य विकास किंवा घरकुल योजना असे अधिकार दिले आहेत. वयस्क तृतीयपंथींनाच आता शिकून उपयोग काय, असे वाटत होते. पण, त्यांना तुम्हाला आत्मसन्मान मिळेल, असे समजून सांगितल्यावर हे सर्वजण शिक्षणासाठी तयार झाले. वयस्क तृतीयपंथींना सही करता येईल, इथपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे.आठवड्यातून दोनदा देणार प्रशिक्षणकेवळ शनिवार व रविवारीच दोन तास त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका तृतीयपंथीचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. तर, दुसऱ्याचे बी.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यामुळे त्याला पुढे बँकिंगच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व तृतीयपंथींना प्रवेश परीक्षा देऊन पुढील शिक्षण घेता येणार आहे. तृतीयपंथींना वर्षा कमलाकार, वरदा जोशी, अपूर्वा जोशी, अर्पिता जोशी, संगीता मुंडल्ये, अश्विनी भिडे प्रशिक्षण देणार आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण