उल्हासनगर :भाजपच्या स्थानिक तीन नेत्यावर गोळीबाराची शक्यता भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त करून, त्याबाबतचे पत्र पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व संबंधित पोलीस ठाण्याला रामचंदानी यांनी दिले. या पत्राने खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर भाजपचा सर्वाधिक आक्रमक चेहरा असलेल्या प्रदीप रामचंदानी यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यावर, तरुण पदाधिकार्यांनी एकच जल्लोष केला होता. मात्र कार्यकारिणीत जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याने नाराजी नाट्यही रंगले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहर कार्यकारणीची बैठक घेतली होती. दरम्यान २५ डिसेंबर रोजी प्रदीप रामचंदानी यांनी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष महेश सुखरामनी, जमनुदास पुरस्वानी व पदाधिकारी अमित वाधवा यांच्यावर गोळीबार होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच गोळीबार प्रकरणी त्यांचे नाव गुंतविण्याची शक्यता रामचंदानी व्यक्त केली. याप्रकरणी तपास सुरू असताना रामचंदानी यांच्या पत्राचे भिंग फुटून शहरात गोळीबार पत्रांची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे स्थानिक आमदार कुमार आयलानी यांना याबाबत विचारणा केली असता, पत्राबाबत सविस्तर माहिती नसल्याचे त्यांनी सांगून आमच्यात कोणतेही अंतर्गत मतभेत नसल्याचे म्हणाले. तर माजी शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना गोळीबार होण्याबाबत व त्यामध्ये त्यांचे गुंतविले जाण्याची माहिती मिळाल्यावर, त्यांनी पोलिसांना पत्र पाठवून चौकशीची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती दिली. मात्र या पत्राने एकच खळबळ उडाली असून भाजपचे अंतर्गत मतभेद बाहेर येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी भाजपचे स्थानिक नेते जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी व अमित वाधवा यांच्यावर गोळीबार होण्याची शक्यता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केली. तसेच गोळीबार प्रकरणात त्यांचे नाव गुंतविण्याची शक्यत व्यक्त केली. रामचंदानी यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले असून याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त अजय कोळी अधिक तपास केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली आहे.