शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

"बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे", ठाण्यात झळकले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:35 PM

ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत. 

Narayan Rane: राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल दुपारी पालिसांनी अटक केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना महाड पोलिसांनी जामीनही मंजूर केला. यासर्व घडामोडीं दरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली. आज ठाण्यात याचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत. 

ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर हे पोस्टर झळकत असून यात ''बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे...आज, उद्या, कधीही...मा. उद्धवजींसोबतच.", असा आशय छापण्यात आला आहे. पोस्टरवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नावं आहेत. या दोन्ही नेत्यांकडून हे पोस्टर ठाण्यातील उड्डाणपुलांवर लावण्यात आले आहेत. 

राणेंना झालेली अटक म्हणजे त्यांना देण्यात आलेला राजकीय शह असल्याचं या पोस्टरमधून शिवसैनिकांकडून दाखवून देण्यात आलं आहे. त्यामुळे या पोस्टरची चांगलीच चर्चा ठाण्यात सुरू आहे. 

राणेंना अटक आणि जामीनकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्याविरोधात नाशिक, महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानुसार काल दुपारी राणे यांना संगमेश्वर येथील एका गावातून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं व महाड पोलिसांनी त्यानंतर राणेंना अटक केली होती. राणेंना अटक केल्यानंतर महाड येथील कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना जामीन मंजुर करत त्यांची सुटका केली होती. यावेळी कोर्टासमोर राणेंनी यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिलं आहे. त्यामुळे नाशिकमधल्या अटकेचा निर्णय बदलून आता राणेंना नाशिकच्या पोलीस ठाण्यात केवळ जबाब नोंदविण्यासाठी उपस्थित राहावं लागणार आहे. तशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा