शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाडा तालुक्यात आता भाताशी स्पर्धा करतो आहे बटाटा

By admin | Published: January 06, 2016 12:58 AM

सध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक

वसंत भोईर, वाडासध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली आहे. या लागवडी बरोबरच ऊस, केळी, आले, पपई अशी पिके घेण्याचा त्यांचा मानस या तरूण शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून ते कृषी क्रांती करू पाहत आहेत. वाडा तालुक्याला'भाताचे कोठार' म्हणून संबोधले जाते. येथील' वाडा कोलम ' हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारा पेठेतही त्याला मोठी मागणी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती दर वर्षी तोट्यात जात असल्याने हळूहळू येथील शेतकरी आता भाजीपाला, फुलशेती याकडे वळवला आहे. त्याच बरोबर आता तर बटाटा, केळी, ऊस, पपईची लागवड येथील शेतकरी करीत आहे. तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांनी 'शांतीदूत ग्रुप फामिॅग' या संस्थेची स्थापना केली असून तिचे दोनशे पन्नास तरूण शेतकरी सदस्य झाले आहेत. यापुढे पुढील वर्षांत ३ हजार ५०० शेतकरी सदस्य करण््याचा त्यांचा विचार असून येथे 'कृषी क्रांती' करण्याचा मानस आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना भातपीका ऐवजी इतर पिकांचा पर्याय सर्व मार्गदर्शनासह देऊन स्वावलंबी बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील देवघर, गांध्रे, ढाढरे, कांबारा, घोडमाळ, आंबिस्ते , पालसई, विलकोस, निचोळे, वावेघर, शेलटा, बोरांडा या गावात सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्याची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता हिरवेगार बहरले आहे. त्यासाठी सर्व प्रथम जमिनीची नांगरणी केली जाते. नंतर वाफे तयार करतात. त्यानंतर पाणी देऊन ते भिजवले जातात. ते पुन्हा सुकवून दोन ते तीन दिवसात आठ इंच अंतरावर व चार इंच खोलीवर बटाट्याची लागवड केली जाते. येथील वातावरण, हवामान व जमिन या पिकासाठी योग्य असल्याचे येथील शेतकरी सांगतात. या पिकाला कमी पाणी लागते. तसेच औषधे, खते, मजुरीचा खर्च अंत्यत कमी असतो. तसेच शेणखताचा जास्त मारा दिल्यास अधिक चांगले असते. या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याचे प्रमाण कमी असते. चार ते पाच मजूर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करू शकतात. त्यामुळे या पिकाला मजूरीचा खर्च फारसा होत नाही. निबोंली मेन्टस व १८:१८ :१८ या खताचा वापर यासाठी केला जातो. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागते. एकरी २३ हजार झाडे बसतात. त्याचे उत्पन्न १० ते १४ टनापर्यंत येते. एका एकराला १ लाख ४० हजारापर्यत मिळू शकते. या पिकावर करपा व बुरशी जन्य रोग पडू शकतात. मात्र औषध वेळेवर मारल्यास ते टाळता येतात. हे पिक वेफर्ससाठी ९० दिवसात तयार होते तर भाजीसाठी ७५ दिवसात तयार होते. येथील तरूण शेतकरी व कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शांतीदूत ग्रुप फामिॅगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटे शेतीसाठी बि - बियाणे तज्ञ गणेश पवार व तज्ञ शेतकरी अरूण मोरे, परदेशातील तज्ञही या शेतीसाठी मार्गदर्शन करीत आहे. वेळोवेळी ते प्रत्यक्ष पाहणीही करीत आहेत. तसेच समूह मार्गदर्शनाचाही लाभ देत आहेत. कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतात काय झाले याची माहिती शेतकरी देतात त्यानंतर लगेच त्यावर उपाययोजना होत आहे. प्रफुल्ल पाटील यांनी देवघर येथे स्वत: २ एकर जागेत बटाट्याची लागवड केली असून हे पीक आत्ता पर्यंत समाधानकारक आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरूणांचा शेतीकडे बघणाच्या दृष्टिकोन वेगळा आहे. बटाटेशेती, ऊस, आले, पपई शेती आपण केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसे आपण कमावू शकतो. असा आत्मविश्वास त्यांना आहे.