अंबरनाथ: काटई या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम अजूनही पूर्ण झाले नसून काम पूर्ण होण्याआधीच काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या दर्जा पूर्ण खालावला असून ठेकेदाराकडून हा रस्ता पूर्ववत करून घेण्याची मागणी आता वाहन चालक करीत आहेत.
खोणी काटई महामार्गाच्या एका लेनच्या कमला २२ डिसेंबर २०२२ मध्ये सुरूवात करण्यात आली. काँक्रीटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.मात्र महामार्ग पूर्ण होण्याआधी खड्डेमय होण्यास सुरुवात झाली असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. हे काम पूर्ण होण्याआधी खड्डे तयार झाल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे कामाकडे कानाडोळा झाल्याने ठेकेदाराने आपल्या मनमानी पद्धतीने काम केले आहे. सध्या या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून गटारांची काम सुरू आहेत.
मात्र ठेकेदाराच्या कामावर नियंत्रण न ठेवल्याने सध्या या मार्गावर काँक्रीट रस्त्यावरच खड्डे पडल्याने या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर खड्डे पडलेले काँक्रीट रस्ते पुन्हा फोडून त्या ठिकाणी नव्याने काँक्रीट रस्ता बनवावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे