लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पावसाळा सुरु होताच ठाण्यातील कापुरबावडी, माजिवडा उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. या पुलांची भाजप आमदार संजय केळकर यांनी पाहणी देखील केली होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून त्यांनी येथील खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. याशिवाय महापालिकेने देखील खड्डे कोणाचेही असो ते बुजविण्यासाठी पावले उचल्याचे दिसून आले आहे. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याठिकाणी खड्डे बुजवित असतांना दुसरीकडे पाऊस आल्याने पुन्हा खड्डे वाहून जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तात्पुरता मुलामा काय कामाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर माीगल आठवड्यात खड्डे पडले होते. त्यातही सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्यांची बांधणी करण्यात आली होती. असे असतांनाही खड्डे पडल्याने कामा बाबतच आता शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. कापुरबावडीचा उड्डाणपुल चढल्यानंतर नाशिकच्या दिशेने जाणाºया रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पुढे मुंबईकडे जाणाºया वाहनीवर देखील खड्डे पडल्याचे दिसत आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनी या उड्डाणपुलांची पाहणी केली होती. परंतु पाहणी करण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्डे बुजविल्याचे दिसून आले. परंतु पाऊस आला खड्डे पुन्हा वाहून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कापूरबावडी, माजीवाडा, पातलीपाडा आदी उड्डाण पुलांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामला सुरुवात केली असून अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
नितीन कंपनी उड्डाणपुलावर खड्डेसार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केली असतांना आता दुसरीकडे एमएसआरडीसीच्या ताब्यात असलेल्या नितिनी कंपनी उड्डाणपुलावर देखील खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता या प्रशासनाला जाग केव्हा येणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
महापालिकाही खड्डे बुजविण्यासाठी सज्जमहापालिकेच्या मालकीच्या रस्त्यांना सध्या खड्डे पडले नसले तरी देखील पातलीपाडा पुला खाली, ब्रन्हांड जंक्शन आणि गोल्डन डाईज नाका येथे खड्डे पडल्याचे आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे रस्ते कोणाचेही असोत, ते तत्काळ बुजविण्याचे आदेश त्यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्डे भरले आहेत.