ठाणे : वटपौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी ठाण्यातील ३०० वर्षे जुने व ठाण्याचे भूषण असलेला महाकाय वड जगवावा, त्याचबरोबर वृक्षाबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी, ग्लोबल वार्मिंगचे संकट आणि भीषण पाणीटंचाई, निसर्गस्रेही विकास व्हावा, याकरिता स्त्री-पुरूषांनी हेरिटेज वृक्षाची पूजा केली. याप्रसंगी कोलशेत येथे मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिकांनी उपस्थित राहून ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युसतर्फे आयोजित उपक्रमास पाििंबा दर्शवला. उपस्थितांना उंबराच्या वृक्षाच्या बिया भेट देत, त्या बिया आपल्या परिसरात लाऊन झाडे वाढवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.वंदना शिंदे यांनी गीत घेऊन कार्यक्र म सुरू केल्यानंतर अंजली भालेराव, नितीन देशपांडे, अनिल शाळीग्राम, विद्याधर वालावलकर, महेंद्र मोने, ठाणे मतदाता जगरणच्या सुनीती मोकाशी, डॉ.चेतना दिक्षित, प्रणव भागवत,श्रीलता यांनी मार्गदर्शन केले. अभियान व येऊर एन्व्हरायनमेंट सोसायटीच्या रोहित जोशी, ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अध्यक्ष संजीव साने, स्वराज इंडियाचे सुब्रतो भट्टाचार्य, प्रत्युष, म्युसचे निशांत बंगेरा आदी उपस्थित होते. वृक्ष वाचविण्याचा निर्धार करून राष्टÑगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
वटपौर्णिमेला हेरिटेज वडाची ठाण्यात पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:30 AM