बदलापूर : बदलापूरच्या कात्रज येथील स्विचींग स्टेशन मध्ये बिघाड झाल्याने बदलापूर आतील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे रात्री दहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बदलापूरच्या कात्रज येथील सिंग स्टेशनमध्ये सायंकाळी पाच वाजता मेन केबल जळाल्याने कात्रप परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचारी संपावर असल्याने खासगी कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.
आज संपाचा पहिलाच दिवस असल्याने कर्मचारी संपावर असल्याने या ठिकाणची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी विलंब होत आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खाजगी कर्मचाऱ्यांची मदत घेऊन हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे बदलापूरच्या कात्रज परिसरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. बदलापूरमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे.बदलापूरच्या कात्रप परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. शहराच्या ५ ते १० टक्के भागात ब्लॅकआऊट झाला आहे. ग्रामीण भागात आंबेशिव, वसत आणि इतर परिसरात डियोफॉल्टमूळे व्होल्टेज डाऊन झाले आहे.