कल्याण : केडीएमसीच्या नेतिवलीतील इंग्रजी माध्यमाच्या प्रबोधनकार ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. पालकांनी त्यासाठी दाखला मागितला असता दाखल्याचे रजिस्टरच गहाळ झाल्याची धककादायक बाब उघडकीस आली. या प्रकारानंतर शिक्षण समितीच्या प्रशासकीय अधिकाºयांनी पालकांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली.महापालिकेच्या ६४ शाळांमध्ये १० हजार ५०० विद्यार्थी आहेत. मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि तामीळ माध्यमांच्या या शाळा असल्या तरी बहुतांश मराठी माध्यमाच्या आहेत. मराठी शाळांतील विद्यार्थी रोडावत असल्याने २००९ मध्ये नेतिवलीत प्रबोधनकार ठाकरे इंग्रजी माध्यमाची शाळा महापालिकेने सुरू केली. या शाळेमुळे गरिबांच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमात शिक्षण घेता येऊ लागले.इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात सुरुवातीला २५ विद्यार्थी होते. दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी वाढल्याने ही संख्या ६०० इतकी झाली. मात्र, या शाळेतील शिक्षकांना पगारच मिळत नसल्याने सध्या चारच शिक्षक उरले आहेत. हे शिक्षक इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गाला शिकवत आहेत. इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गाला शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वाºयावर आहेत. दोन वर्षांपूर्वीपासून शाळेची परवड सुरू आहे. त्यामुळे ४०० विद्यार्थी गळाले आहेत.दुसरीकडे, या शाळेतील मराठी माध्यमात २० शिक्षक आहेत. तेथे सहा शिक्षक अतिरिक्त आहेत. मात्र, ते इंग्रजी माध्यमाला दिलेले नाहीत. याविषयी पालक नम्रता सोनार या वारंवार पाठपुरावा करत आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे तसेच युवासेनेचे पदाधिकारी संजय मोरे व संदीप माने याबाबत पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांनाही प्रशासन दाद देत नाही.
प्रबोधनकार ठाकरे शाळेतील विद्यार्थी वा-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:26 AM