शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

सुवर्णकन्या करते चिखलात सराव

By admin | Published: October 21, 2016 1:04 AM

चिखलमाती, दगडगोटे, दारूड्यांनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा अशा मैदानात सराव करून इंटरस्कूल ते राष्ट्रीयस्तरावरील गोळाफेक स्पर्धेत आपला आगळावेगळा

ठाणे : चिखलमाती, दगडगोटे, दारूड्यांनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा अशा मैदानात सराव करून इंटरस्कूल ते राष्ट्रीयस्तरावरील गोळाफेक स्पर्धेत आपला आगळावेगळा ठसा उमटवून अवघ्या १४ वर्षीय अग्रता मेलकुंडे हिने ४१ पदके पटकावली असून यामध्ये ३६ सुवर्णपदकांचा समावेशे आहे. नुकताच नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णकन्या ठरलेल्या अग्रताने आता आपले मिशन थेट आॅलिम्पिक ठेवले आहे. एकीकडे वडिलांचे छप्पर हरपल्यानंतर अग्रतान आईच्या हिमतीवरच खेळाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.पारसिकनगर परिसरात राहणारी अग्रता ही सेंट जॉन हायस्कूलची विद्यार्थिनी असून ती इयत्ता नववीत शिकते. मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणारे तिचे वडील महेश यांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे अग्रताच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी तिची आई प्राची यांच्या खांद्यावर पडली. अग्रता हिचा लहानपणापासूनच खेळाकडे कल असल्याने आईने तिला सर्व मदत केली. शालेय ते राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून आतापर्यंत तिने तब्बल ४१ पदके पटकावली आहेत. ही पदके पटकावताना तिने गोळाफेक खेळात अनेक रेकॉर्ड नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिच्या नावावर आतापर्यंत ८ रेकॉर्डची नोंद आहे.दादोजीमध्ये सराव करायला मिळेल काठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडिअम असतानाही अग्रता कळव्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मैदानावर सराव करते. या मैदानाची परिस्थिती दगडगोटे, पाण्याचे डबके आणि दारूड्यांनी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा अशीच आहे. या अडचणीतही तिने सराव सुरूच ठेवला आहे. मात्र, पदकांची संख्या वाढतानाही दादोजीमध्ये तिला सराव करण्यासाठी जागा मिळत नसल्याची खंत तिची आई प्राची यांनी व्यक्त केली. सध्या मी १४ वर्षीय वयोगटात खेळते, पण लवकरच १७ वर्षीय वयोगटात खेळणार आहे. तसेच आगामी लक्ष्य हे मिशन आॅलिम्पिक आहे. माझे प्रशिक्षक हे माझे देव असून त्यांच्यामुळेच मी आतापर्यंतचे यश मिळवू शकले. त्याचबरोबर आईच्या हिमतीवरच मी ही झेप घेईल.- अग्रता मेलकुंडेअग्रताची इच्छाशक्ती आणि तिची मेहनत पाहूनच तिला मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. जिद्द असेल तर कोणत्याही खेळाडूला कोणत्याही महागड्या साधनांची गरज भासत नाही. तसेच परिस्थितीवर मात करू न असे खेळाडू पुढे जातात, हे तिने वारंवार आपल्या दाखवून दिले.- तरविंदर सिंह, प्रशिक्षक