ठाणे : तब्बल एक हजार धावांचा भीमपराक्रम करणाऱ्या प्रणवची सही घेण्यासाठी एकच गर्दी झाली असताना त्याची पहिली सही घेण्याचा मान ठाण्याचे सह्याजीराव सतीश चाफेकर यांना मिळाला. माय फर्स्ट आॅटोग्राफ असे लिहून त्याने आपली सही केली. प्रणवेने वैयक्तिक एक हजार धावांची नाबाद झंजावती खेळी करून आंतरशालेय क्रिकेटमधील वैयक्तिक धावसंख्येचे सर्व विश्वविक्रम मोडीत काढले. के.सी. गांधी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणवने सगळ््यांनाच थक्क करुन सोडले. प्रणवची सही घेण्यासाठी पहिली धाव घेतली ती चाफेकरांनी. क्रिकेट खेळाडूंची बॅटवर सही घेण्याचा चापेकरांचा एक आगळाच छंद. प्रणवची खेळी पाहण्यासाठी ते बॅट घेऊनच गेले होते. शेवटच्या रनपर्यंत उपस्थित असलेल्या चाफेकरांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेऊल आपल्या हातात असलेल्या बॅटवर धाव त्याची सही घेतली. प्रणवचे १००९ धावसंख्या होऊपर्यंत त्याची खेळी पाहिली. त्याची सही घेण्यासाठी त्याच्याकडे गेले असताना त्याने चकीत होऊन माझी सही का? असा सवाल केला. तेव्हा तुझी सहीदेखील महत्त्वाची असल्याचे त्याला सांगितले. यावेळी त्याचे नातेवाईक देखील भावूक झाले असल्याचे चाफेकरांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रणवची पहिली सही चाफेकराकडे
By admin | Published: January 07, 2016 12:41 AM