अंबरनाथ - अंबरनाथ मोरीवली येथील एमआयडीसी भागात प्रेशिया कंपनीला लागलेल्या आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या कंपनीचे सरासरी १० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. या आगीत चार कामगार जखमी झाले होते. त्यापैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी ऐरोली येथील बर्नसेंटरमध्ये दाखल केले.प्रेशिया या केमिकल कंपनीला आग लागल्याने या आगीत कंपनी जळून खाक झाली आहे. कंपनीमध्ये अनेक नवीन बदलही करण्यात आले होते. या कंपनीची अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यात आली होती. मात्र कंपनीतील शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीतील अग्निशमन यंत्रणा सुरु करण्याची संधीच कामगारांना मिळाली नाही. या आगीत कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वतीप्रसाद मिश्रा, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे आगीच्या विळख्यात सापडले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना पांडा यांची प्रकृती बिघडली. त्यांना ऐरोलीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्रेशिया कंपनीच्या आगीतील जखमीची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 3:19 AM