लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना यापुढे वैद्यकीय रजा घेण्याकरिता पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे परिपत्रक प्रशासनाने जारी केल्याने तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. आपण आजारी पडणार याची अगोदर कुणाला माहिती असते, असा सवाल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला आहे तर वैद्यकीय रजेचा सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून होत असलेला गैरवापर आणि अपुरी कर्मचारी संख्या यामुळे असे परिपत्रक काढण्याची वेळ आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सार्वजनिक सुट्टया, अर्जित रजा, जादा कामाकरिता बदली रजा उपभोगायची झाल्यास पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. मात्र आता वैद्यकीय रजा घेण्यापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक केले आहे. एखाद्या सुरक्षा कर्मचाऱ्याला मनासारखी ड्युटी मिळाली नाही तरी तो विनापरवानगी आजारपणाची रजा घेतो. कामावर रूजू होताना डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करतो. गेल्या काही महिन्यांत असे प्रकार वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एखादा कर्मचारी खरोखरच आजारी पडल्यास त्याबाबतची माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्याच्या जागी दुसरा कर्मचारी नेमताना संबंधित विभागाची चांगलीच तारांबळ उडते, असेही प्रशासनाचे मत आहे.
आजारी पडण्यासाठीही पूर्वपरवानगी आवश्यक!
By admin | Published: May 24, 2017 12:57 AM