ठाणे : सायबर क्राइम तसेच सोनसाखळी चोरट्यांपासून सावधानता कशी बाळगावी, याची चित्रफीत पोलीस ठाण्यात पासपोर्ट तसेच विविध कामांच्या निमित्ताने येणा-या नागरिकांना दाखवण्याच्या उपक्रमाचे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते गुरुवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात उद्घाटन करण्यात आले.‘बँक आॅफ महाराष्टÑ’ वर्तकनगर शाखा आणि वर्तकनगर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. बँकेच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) या फंडातून पोलीस ठाण्याला टीव्ही संच देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या संकल्पनेतून सोनसाखळीचोरी कशी रोखायची? बँकेतील पैशांची आॅनलाइन फसवणुकीपासून कसे सावध व्हायचे, अशा वेगवेगळ्या प्रकारे होणा-या आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांची मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांच्या माध्यमातून पाच ते दहा मिनिटांच्या वेगवेगळ्या चित्रफिती बनवण्यात आल्या आहेत. पेनड्राइव्हच्या माध्यमातून त्या चित्रफिती पोलीस ठाण्याच्या पासपोर्ट विभागात ठेवलेल्या टीव्हीवरून दाखवण्यात येणार आहेत. पासपोर्ट विभागात विविध दाखल्यांच्या परवानगीसाठी येणाºयांचे काम होईपर्यंत आपली सुरक्षा आपण कशी घ्यायची, या विषयावर चित्रफितीतून नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या संकल्पनेतून पासपोर्ट विभागात या प्रबोधनात्मक चित्रफिती दाखवण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बँकेचे ठाणे परिमंडळ परिक्षेत्रीय व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक एम.जी. महाबळेश्वरकर, वर्तकनगर शाखेचे शशिकांत दीपंकर, पोलीस निरीक्षक बी.एस. तांबे, सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, चंद्रकात यादव,उपनिरीक्षक सचिन आंब्रे, सुहास हाटेकर, हवालदार प्रताप येरुणकर, भूषण गावडे आणि वैभव खोत यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
गुन्हेगारांपासून सावधानता : ठाण्यात जनजागृतीसाठी वर्तकनगर पोलिसांचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:41 PM
सुरक्षितता कशी घ्यावी? या विषयावर चित्रफितीद्वारे प्रबोधनाचा उपक्रम वर्तकनगर पोलिसांनी सुरु केला आहे. ‘बँक आॅफ महाराष्टÑ’ वर्तकनगर शाखा आणि वर्तकनगर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
ठळक मुद्देसीएसआर फंडातून बँकेने दिला टीव्ही संचपोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचे होणार प्रबोधनउपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन