सुरेश लोखंडेठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत. उशिरापर्यंत या मोठी पोहण्याची शक्यताा वर्तवण्यात आली आहे. या बोटी किना-यास लागेपर्यंत सर्वांचे लक्ष त्याकडे लागून आहे.सुमारे ४८ तासाच्या कालावधीत ओक्खी चक्रीवादळ गुजराथ व मुंबईच्या समुद्रात धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे - पालघर जिल्ह्यातील शेकडो मच्छीमा-यांच्या सुमारे एक हजार ३८४ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. यापैकी एक हजार ३४९ बोटी ठिकठिकाणच्या किना-यावर सुखरूप लागल्याचा दावा येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तालयाकडून केला जात आहे. उर्वरित पालघर जिल्हह्याच्या ३४ मच्छीमार बोटींसह ठाणे जिल्ह्यातील एक बोट अद्याप समुद्रात आडकलेली आहे. परंतु या सर्व बोटी सुख्यरूप असून त्यावेळीच किना-यावर लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.ओखी या जीव घेण्या चक्रीवादळापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होऊन नये म्हणून हवामान खात्याच्या सुचनेनुसार किनारपट्टी लगतच्या गावांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिकां, पोलिस आयुक्तालय, पोलिस अधिक्षक, तहसिलदारांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणाना देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छीमा-यांसह सर्वांना कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तर समुद्रातील बोटींना जवळच्या किना-यावर लागण्याचा संदेश देऊन खातर जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातून ६९० मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यातील ६८९ बोटी परत येऊन किना-यास लागल्या आहेत. उर्वरित गस्पेल गौ-या यांची ‘ दंवदास’ ही बोट देखील लवकरच उत्तन बंदरात लागणार आहे. त्यातील खलासी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. झाई, वरोर, आगर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू,घिवली, उच्छेळी, नवापूर, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, वडराई, टेभी, दादरपाडा, केळवे, माहीम, केळवा, एडवण, कोरे, दातिवरे, किल्लाबंदर (अर्नाळा), पाचूबंदर, नायगाव आणि खोचिवडे आदी पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून ६९४ मच्छीमार बोटी समुदा्रत गेल्या असता त्यापैकी ६६० बोटी किना-यास सुख्यरूपपणे लागल्या आहेत.समुद्रात पालघरच्या आडकलेल्या ३४ बोटी किनाºयावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डहाणू बंदारातील भाग्यसाई, मातोश्रीप्रसाद, व गणेश धानमेहेर यांची भाग्यसाई या तीन बोटी समुद्रात आहेत. याशिवाय धाकटी डहाणूची धनवृद्धी, एडवन बंदरातील जयदत्तसाई ही बोटी परत आली नाही. तर सातपाटी बंदारातील १८६ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. त्यातील १५७ बोटी परत आल्या आहेत. तर २९ बोटी समुद्रात आहेत. त्या लवकरच किना-यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणांसह मच्छीमार विकास सहकारी संस्था सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत.
ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सावधानतेचा इशारा; ठाणे-पालघरच्या ३५ बोटी अद्याप समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:21 PM