मुंबई - अहमदाबाद मार्गावर अपघात - चार महिला ठार,पाच गंभीर मनोर : गर्भवतीला रुग्णालयात नेत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गजवळील वरई सफाळे रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला सहा आसनी टॅक्सीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार महिला ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मृतांमध्ये काजल चिमडा या गर्भवतीचा समावेश आहे. जखमींना मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नावझे येथील गर्भवती काजलला प्रसुतीसाठी मनोर येथे सहा आसनी रिक्षाने कुुटुंबीय घेऊन जात असताना वरई सफाळे रस्त्यावर उभा असलेला ट्रकला धडक दिली. यामध्ये भारती पाटील, भानुमती लाबड , यमुना धोडी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला .तर काजलचे हिचे उपचारादरम्यान निधन झाले. अपघातात संजय धोडी, मनिष सोगले, पुष्पा चिमडा, विनायक पाटील, व कल्पेश चिमडा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिदुर्गम आदिवासी गावांत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्थापन करून कर्मचार्यांच्या नेमणूका केल्या. मात्र मासवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे आरोग्य उपकेंद्र दहिसर येथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका नसल्याने नावझे येथील काजलला प्रसुतीसाठी मनोर ग्रामीण रूग्णालयामध्ये नेण्यात येत होते. तसेच महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिकेलाही कुटुंबीयांनी बोलाविण्याचा प्रयत्न केला मात्र उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी सहाआसनी टॅक्सी करून रुग्णालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अपघातात गर्भवतीचा मृत्यू
By admin | Published: June 08, 2015 11:57 PM