शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; शिंदे गटातील अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा

By अजित मांडके | Published: October 04, 2022 4:07 PM

शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या १८५ बस बुक करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय अडीच लाख शिवसैनिकांसाठी ठाण्यातील नावाजलेल्या मिठाईवाल्याकडून जेवणाचे डबे देखील रवाना होणार आहेत.

ठाणे  : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून ३५० बसेस रवाना होणार असून, ५० हजार शिवसैनिक या दसरा मेळाव्याला हजेरी लावतील, असा दावा करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र लोकल व पायी प्रवासाला महत्व देत शिवतीर्थावरील दसरा मेळावा हाच खरा मेळावा असल्याचे सांगितले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी ठाण्यात शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे बॅनर लावण्यात आले होते. आता ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्याचे बॅनर समोरा-समोर झळकल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. 

शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या १८५ बस बुक करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय अडीच लाख शिवसैनिकांसाठी ठाण्यातील नावाजलेल्या मिठाईवाल्याकडून जेवणाचे डबे देखील रवाना होणार आहेत.

ठाकरे आणि शिंदे गट वेगळा झाल्याने यंदा दसरा मेळाव्याला देखील अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. दसरा मेळावा हीट करण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसैनिकांना विविध स्वरुपाची प्रलोभने दिली जात आहेत. त्यात प्रत्येक माजी नगरसेवकाला ५ ते १० बसची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ३५० बस ठाण्यातून रवाना होणार असून ५० हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय छोट्या वाहनांची सोयदेखील करण्यात आली आहे. तर ठाण्याच्या विविध भागांत दसरा मेळाव्याचे बॅनरही झळकले आहेत.

तिकडे ठाकरे गटाने मात्र, लोकल प्रवासाला पसंती दिल्याचे दिसत आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाण्यात जांभळीनाका येथे शिवसैनिक जमणार असून त्याठिकाणी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर लोकलने खासदार राजन विचारे यांच्यासह हजारो शिवसैनिक शीवतिर्थावर रवाना होणार आहेत. ठाकरे गटाकडून बसची व्यवस्था मात्र करण्यात आल्याचे दिसत नाही. तर, ठाकरे गटाकडूनही ठाण्याच्या विविध भागात बॅनर लावण्यात आल्याचे दिसत आहे. बॅनरबाजीतून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याचे दिसत आहे.

 एसटीच्या १८५ बस जाणार दसरा मेळाव्याला - शिवसेनेच्या बालेकिल्यातून अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यातून बीकेसीला दसरा मेळाव्यासाठी १८५ बस जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील १६० बस भिवंडी तर २५ बस वाडा डेपोतून जाणार असल्याची माहिती एसटीच्या सुत्रंनी दिली. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या बस बुक केल्याचे बोलले जात आहे.

 अडीच लाख शिवसैनिकांना जेवण ठाण्यातून शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांची जेवणाची सोय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठाण्यातील नामांकीत मिठावाल्यालाकडून तशा प्रकारचे जेवण तयार करण्याचे काम करण्यात आले आहे. या फुड पैकेट मध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे पदार्थ देण्यात आले आहेत. खिचडी, वडापाव, समोसा असे पदार्थ देता जे चांगले राहतील असे पदार्थ ठेवण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे