शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

सूर्याच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची सज्जता

By admin | Published: March 17, 2017 5:49 AM

सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे

हितेन नाईक , पालघरसूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागण्याची आपत्ती ओढवू शकते. हे लक्षात घेऊन सूर्याचे पाणी जिल्ह्यातच राखण्यासाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. सूर्या प्रकल्प हा जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रकल्प असून पालघर, विक्रमगड, डहाणू या तीन आदिवासी तालुक्यातील सुमारे १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे व ६.७५ मेगा वॅट वीजनिर्मिती करणे हा मूळ उद्देश बाजूला सारून मतांच्या वजनाचा सोईस्कररित्या वापर करून इथले पाणी वसई-विरारला नेले. राजकीय दबावातून सरकारने मीरा-भार्इंदरला दिले. त्यानंतर उरलेले पाणी मुंबई उपप्रदेशासाठी वळविण्यात आले आहे. हे रोखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीला सूर्याच्या पाण्यासाठी प्रारंभा पासून लढा देणारे माजी आमदार नवनीत भाई शहा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, कुणबी सेनेचे जितू राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माकपचे एडवर्ड वरठा, कष्टकरीचे ब्रायन लोबो, आदिवासी एकताचे दत्ता करबट, श्रमजीवीचे राजेश राऊत, शेतकरी संघर्षचे संतोष पावडे, राजेश अधिकारी होते. रिपाई, मनसे, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.डहाणू : सूर्या पाटबंधारे विभागांतर्गत आगवण ग्रामपंचायत हद्दीत चरी कोटबी येथे मागील काही महिन्यांपासून कालव्याला मोठे भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होऊन शेतीला पाणी मिळत नव्हते. परिणामी आगवण परिसरात पाणीटंचाई भेडसावू लागली होती. त्याबाबत ग्रामपंचायतीने कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस सरपंच दमयंती भुयाळ, उपसरपंच रूपजी कोम, ग्रामसेवक अरविंद संखे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने हा कालवा दुरुस्त केला. त्यामुळे आगवण गावातील आजूबाजूच्या पाड्यांची पिण्याच्या पाण्याची, तसेच सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. सूर्या पाटबंधारे विभागाचा कालवा दाभले, वरून चरी कोटबी आगवणकडे जातो. भगदाड पडून पाणी वाहून जात होते. त्यामुळे चरी कोटबी, आगवण , दाबले, चिंचले या पाड्यांना शेतीला पाणी मिळत नव्हते. त्याबाबत ग्रामपंचायतीने सतत सूर्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करु न दुरूस्ती करण्याची मागणी केली होती पण ती व्यर्थ ठरली.जवळजवळ १ लाख खर्च केले, जलवाहिनी दुरुस्त केली. आगवण ग्रामपंचायतीच्या मानपाडा, वाघाडी, शिशुपाडा, नवासाखरा, आगचण, चरी कोटबी या पाड्यांची पाण्याची समस्येवर त्यामुळे काही अंशी मात झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण पसरले आहे.