शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

काटकसरीचा, आर्थिक शीस्तीचा कोणतीही करवाढ दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

By अजित मांडके | Published: March 21, 2023 3:01 PM

४३७० कोटींचा मुळ अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोणतीही करवाढ व दरवाढ नसणार काटकसरीचा आर्थिक शिस्तीचा सन २०२३-२४ चा ४३७० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची छाप असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोणत्याही जुन्या प्रकल्पांचा यात समावेश नसून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शिक्षण, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, खड्डेमुक्त रस्ते, शुन्य कचरा मोहीम आदी महत्वाच्या मुद्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ मध्ये ३३८४ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र काही विभागांच्या उत्पन्नात घट येत असल्याने महसुली उत्पन्न ३०२१ कोटी ५१ लाखा ऐवंजी २७८५ कोटी ४५ लाखांचा अर्थसंकल्प सुधारीत करण्यात आला आहे. अशा प्रकारे २०२२ -२३ मध्ये आरंभीच्या शिल्लकेसह सुधारीत अंदाजपत्रक ४२३५ कोटी ८३ लाख व सन २०२३-२४ मध्ये आरंभिची शिल्लेकसह मुळ अंदाजपत्रक ४३७० कोटींचे सादर करण्यात आले. कोणतीही करवाढ दरवाढ नाही, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चात वित्तीय शिस्त, अनावश्यक महसुली खर्चात कपात, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या त्रीसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, भांडवली कामांअंतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करणे, प्रशासकीय कामात सुधारणा, प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करणे, कामांचा दर्जा उत्तम ठेवणे आदी महत्वाची उद्दीष्टे या अर्थसंकल्पातील आहेत.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानाला महत्व- स्वच्छ ठाणे अंतर्गत शुन्य कचरा मोहीम राबविणे, हस्तांतरण स्थानक, डायघर प्रकल्प कार्यान्वित करणे, दिवा क्षेपणभुमी बंद करणे, सार्वजनिक रस्ते साफसफाई आदींसह स्वच्छ शौचालया अंतर्गत शौचालय नुतनीकरण व पुनर्बांधणी, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, कंटेनर शौचालय उभारली जाणार आहेत. याशिवाय खड्डेमुक्त ठाणे अंतर्गत मजबुत रस्त्यांचे जाळे, सिमेंट क्राँक्रीट रस्त्यातील अंतर सांधे भरणे, चरांचे पुनपृष्टीकरण, रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी विशेष लक्ष आदी कामे केली जाणार आहेत. तर सुंदर ठाणे अंतर्गत शहर सौंदर्यीकरणावर भर देणे, एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभिकरण, सीएसआर माध्यमातून तलाव संवर्धन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना राबविली जाणार आहेत. तसेच यात आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त मानधन, अ‍ॅनोमली स्कॅन,प्रसुतीगृहांचे बळकटीकरण, पोषण आहार, माृतत्व भेट आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

पार्कींग प्लाझा येथे मल्टीस्पेशॅलीटी हॉस्पीटल, माझी आरोग्य सखी, महापालिका हद्दीत सीबीएससी शाळा सुरु करणे, कळवा रुग्णालयाचे बळकटीकरण, मराठी शाळांचे सक्षमीकरण, इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा सुरु करणे, अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सक्षम करणे, दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्था, झोडपट्टी तिथे वाचनालय, वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना,घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वे चा विस्तार, आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे, पार्कींग, क्लस्टर योजना,अंतर्गत मेट्रो, प्रदुषण मुक्त व धुळमुक्त ठाणे, धर्मवारी आनंद दिघे स्वंयरोजगार योजना, फेरीवाला धोरण, प्रशासकीय कामात सुधारणा, म्युनिसीपल फंड, आदी महत्वाच्या बाबींचा यात समावेश आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका