ठाणे : गेली आठ वर्ष सातत्याने नवनवीन संकल्पना,नाट्यप्रयोग साकारणाऱ्या कट्टयावर खेळ मांडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक,सैनिक,डॉक्टर,पोलीस आणि शेतकरी यांच्या वेदना मांडण्यात आल्या. अभिनय कट्टयावर हा कार्यक्रम पार पडला. यंदाचा हा ३९४ क्रं चा कट्टा होता.
सैनिक,शेतकरी,डॉक्टर,पोलीस,शिक्षक हि मंडळी आपल्या देशाचे खरे हिरो आहेत.स्वतःची सुख दुःख बाजूला सारत हि मंडळी समाजासाठी अहोरात्र झटत असतात.मात्र यांना चालवणारी व्यवस्था भ्रष्ट आहे असा आरोप केला जातो.या गोष्टीत तथ्य असले तरीही हि मंडळी याकडे कानाडोळा करत आपले समाज सेवेचे व्रत चालू ठेवत आहेत.या कार्यक्रमाच्या माध्यमातून सैनिकांना सीमेवर उदभवणारे प्रश्न व त्यावर केलेली मात.शिक्षकांच्या समस्या आणि मराठी शाळांचे घटते प्रमाण यावर भाष्य.शेतकऱयांची दयनीय अवस्था,अवकाळी पाऊस व सरकारची फसलेली कर्ज माफी.डॉक्टरांवरील मानसिक ताण या गोष्टी मांडण्यात आल्या. एका मुस्लिम पोलीस हवालदाराला विसर्जनाच्या वेळी एक कुटुंब गणपती बाप्पांच्या आरतीचा मान देतात.हा प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भावून गेला. अभिनय कट्ट्याच्या स्वप्नील माने,ओंकार मराठे,शुंभांगी भालेकर,उत्तम ठाकूर,सहदेव साळकर,वैभव पवार,महेश झिरपे या कलाकारांनी यात काम केले. खेळ मांडला हि संकल्पना किरण नाकती यांनी सुचवली आणि कट्ट्याच्या कलाकार परेश दळवी याने याचे लेखन,दिग्दर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन स्वप्नील माने याने केले.तसेच यावेळी शुभांगी भालेकर,रोशनी उंबरसांडे,सहदेव कोळंबकर,न्यूतन लंके,उत्तम ठाकूर,साक्षी महाडिक या कलाकारांनी एकपात्री सादर केली