ठाणे : सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या अभिनय कट्ट्यावर दिवसेंदिवस दर्जेदार सादरीकरणाची भर पडत आहे. ‘अभिनय कल्याण निर्मित’ “गस्त” या नाटकाचा प्रयोग अभिनय कट्ट्यावर सादर झाला.
कलाकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. “गस्त” या नाटकाचे लेखन “दिलीप जगताप” व “दिग्दर्शन “अभिजीत झुंजारराव” यांनी केले होते. यंदाचा हा “४०८ क्रमांकाचा” कट्टा होता. “गस्त” हे मरण या विषयावरचे जिवंत नाटक आहे असं म्हणता येईल. कोणाच मरण, तर कोणाच गस्त कोणासाठी कोणाच्या आदेशाने प्रश्न निर्माण होतात तसेच आजकालच्या राजकारणावर आणि त्यातल्या दाहकतेवर परखडपणे भाष्य या नाटकात केले गेले आहे.संघ परिवाराचे व धोरणाचें अंतरंगयात उलगडले आहे.या नाटकात दहिफळे या नावाचे पात्र आहे. ते इतर पात्रांशी त्याचा विविध हेतूने संवाद साधते, तसेच घाटपांडे, शामू, पोफळे, जनू, हनमा, बाळू, आक्की, डॉक्टर, लीना, ईसम, पोलीस, फणश्या, बाबुश्या, दिन्या, भगत, हरया, माथेफिरू, अबू या पात्रांची बांधणी या नाटकात आहे. या नाटकात राहुल शिरसाट, श्रीकांत पालांडे, प्रथमेश चुबे, श्रेयस मसराम, प्रणव दळवी, रमजान मुलानी, रुचिका खैरनार, राहुल दुग्गल, सायली शिंदे, युवराज ताम्हणकर, प्रथमेश म्हसुरकर, रेश्मा कदम, श्वेता शिंदे, प्राची राठोड, श्रेयसी वैद्य या ककलाकारांनी कामे केली होती. तसेच श्याम चव्हाण याने प्रकाश योजना केली, राहुल शिरसाट याने पार्श्वसंगीत दिले, वैभव क्षीरसागर याने नेपथ्य सहाय्यन केले, विठ्ठल व्हनमाने याने संगीत संयोजन केले, तृप्ती झुंजारराव हिने रंगभूषा / वेशभूषा केली, तसेच हरीश भिसे रंगमंच व्यवस्था यांनी केले. या कट्ट्याचे निवेदन “आदित्य नाकती” याने केले व दीपप्रज्वलन “प्रफुल्ल घाग” यांनी केले.