शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

समाजातील विविध विषयांवर भाष्य करणारे "नाट्यरंग" अभिनय कट्ट्यावर सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 2:14 PM

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर नाट्यरंग सादर करून समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्यात आले.  

ठळक मुद्देसमाजातील विविध विषयांवर भाष्य करणारे "नाट्यरंग" सादर आजचे राजकारण हि द्विपात्री सादरजो शेवटपर्यंत मैदानात थांबतो तोच खरा योद्धा : किरण नाकती

ठाणे : नाटक हे प्रबोधनाचे प्रबळ माध्यम आहे ,हे ३९७ क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर नाट्यरंग ने दाखवून दिले.४०० व्या ऐतिहासिक कट्ट्याकडे वाटचाल करीत शेवटच्या टप्प्यातील प्रत्येक सादरीकरण हृदयाला भिडणारी होत आहेत. नाट्यरंग मध्ये समाजातील विविध विषय द्वीपात्रीच्या माध्यमातून अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी मांडण्याचा प्रयत्न केला.

     राजकारणावर भाष्य करणारी आजचे राजकारण हि द्विपात्री प्रथमेश यादव व वैभव पवार यांनी सादर केली. प्रॉपर्टीसाठी आपल्या वडिलांना एअरपोर्टवर सोडून संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर करून मुलगा अमेरिकेला पसार झाला,हि घटना माणुसकीचा अंत या द्विपात्रीतून  कुंदन भोसले व प्रथमेश मंडलिक यांनी मांडली. माणूस बदलत गेला त्या प्रमाणे इतिहास हि बदलला या विषयावर आधारित बदललेला इतिहास हि द्विपात्री ओमकार मराठे व शुभांगी भालेकर यांनी सादर केली. कोणतीहि घटना घडली कि सरकार त्याचे खापर विरोधी पक्षावर फोडते,अशी ही आरोप प्रत्यारोपाची ह्यात विरोधी पक्षाचा हात हाय हि द्विपात्री सहदेव साळकर व वैभव जाधव यांनी सादर केली.शहरीकरण प्रचंड वाढले असून ग्रामीण भागच जगण्यासाठी योग्य आहे यावर आधारित गड्या गावंच बरा हि द्विपात्री धनेश चव्हाण व उत्तम ठाकूर यांनी सादर केली.कुणाल पगारे व रोशनी उंबरसांडे यांनी नृत्यावर आधारित नाच नाच श्वास हि द्विपात्री सादर केली. वाढती महागाई व पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव यावर आधारित पेट्रोल दरवाढ द्विपात्री माधुरी कोळी व हेमंत यादव यांनी सादर केली. या कार्यक्रमात न्यूतन लंके व रोहिणी थोरात यांनी सादर केलेल्या कॅन्सरवर मात या द्वीपात्रीस प्रथम पारितोषिक मिळाले. सहदेव कोळंबकर व साक्षी महाडिक यांनी समाज हि द्विपात्री सादर करत समाजातील वाईट गोष्टींवर भाष्य केले.प्रकाश आमटे यांनी समाजासाठी केलेल्या थोर कामाची आठवण या द्विपात्रीतून करून देण्यात आली.या द्वीपात्रीस द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

    शिल्पा लाडवंते हिने लावणी सादर करत रसिकांची मने जिंकली व शिल्पा ने पॉलीसी हि एकपात्री देखील सादर केली.रुक्मिणी कदम यांनी "बुढा मिल गया" हे नृत्य सादर केले व एअर हॉस्टेज हि एकपात्री देखील सादर केली.अतिश जगताप याने भिकू हि एकपात्री सादर केली.अजित भोसले याने शेतकाऱ्यांची आत्महत्या हि एकपात्री सादर केली.रोहित सुतार याने धरणी माय हि एकपात्री सादर केली.सई कदम हिने मी अहिंसा बोलतेय हि एकपात्री सादर करत समाजात वाढलेल्या हिंसेबद्दल भाष्य केले. तसेच यावेळी परेश दळवी याने ये जिंदगी का सफर हे मुकनाट्य सादर करत सध्या समाजातील अस्थिरता,वाढती गुन्हेगारी, अंधश्रद्धा या विषयांवर भाष्य केले.कार्यक्रमाचे निवेदन कल्पेश डुकरे याने केले.कदिर शेख यांनी द्वीपात्री स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केले.द्वीपप्रज्वलन दिगंबर सावंत व अपर्णा सावंत यांनी केले. कलाकार सक्षम,समृद्ध व्हावा या उद्देशानेच आम्ही कट्ट्याच्या कलाकारांना द्विपात्रीसाठी असे विषय सुचवले.कलाकारांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे व अभ्यास करून हे विषय हाताळले .एका हि कलाकाराने आम्हाला हे जमणार नाही अशी तक्रार केली नाही.कारण युद्धातून पाठ फिरावणारा हा योद्धा नसतो, जो शेवटपर्यंत मैदानात थांबतो तोच खरा योद्धा असतो अश्या शब्दात अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई