शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

सामाजिक बांधिलकीसाठी रंगांची उधळण, आत्तापर्यंत 27 लाखांची रंगरंगोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:34 PM

बिना या उल्हासनगरातील ओटी सेक्शनमध्ये राहतात. त्याचे पती कुमार वाधवा व त्या  यापूर्वी गेली २५ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. त्यांना रंग कामाची आवड असल्याने त्यांनी अमेरीकेत रंगकाम केले आहे.

ठळक मुद्देबिना या उल्हासनगरातील ओटी सेक्शनमध्ये राहतात. त्याचे पती कुमार वाधवा व त्या  यापूर्वी गेली २५ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. त्यांना रंग कामाची आवड असल्याने त्यांनी अमेरीकेत रंग काम केले आहे.

कल्याण-कल्याण वालधूनी रेल्वे पूलाची रंगरंगोटी एका वयोवृद्ध महिलेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केली आहे. त्यामुळे पूलाचे रुपडे पालटले आहे. रंगरंगोटी करणा:या महिलेचे नाव बिना ओम बेनाम असे आहे. ती उल्हासनगरात राहते. तिने यापूर्वीही शाळा, स्मशानभूमी, अनाथालयांची रंगरंगोटी केलेली आहे.

बिना या उल्हासनगरातील ओटी सेक्शनमध्ये राहतात. त्याचे पती कुमार वाधवा व त्या  यापूर्वी गेली २५ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. त्यांना रंग कामाची आवड असल्याने त्यांनी अमेरीकेत रंग काम केले आहे. त्यांना अमेरीकेत रंगकामाच्या मोबदल्यात ४०० डॉलर मिळत होते. त्यांना एक मुलगा आहे, हा मुलगा सध्या अमेरीकेतच वास्तव्याला आहे. बिना यांच्या एकाय पायाला डबल फॅक्चर झाले असल्याने त्या व त्यांचे पती हे उल्हासनगरात परतले. गेल्या ८ वर्षापासून त्या उल्हासनगरात राहत आहेत. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांना काही रक्कम भेट स्वरुपात आली. ही रक्कम एकूण २८ लाख रुपये होती. ही रक्कम बिना यांनी बँकेत जमा केली. या रक्कमेतून काहीतरी सकारात्मक काम करण्याचे त्यांच्या मनी आली. त्यांनी सर्वप्रथम एका स्मशानभूमीची रंगरंगोटी केली. त्यानंतर सामाजिक बांधिलकीतून रंगरंगोटीचा चंगच बांधला. शाळा, अनाथालये यांची रंगरंगोटी केली आहे. त्यावर आत्तापर्यंत २७ लाख रुपये खर्च झाला आहे. त्यांचे पती कुमार वाधवा यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी पतीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण वालघूनी रेल्वे उड्डाणपूलाचे संरक्षक कठडे रंगविण्यास सुरु केले. गेल्या दोन दिवसापासून बिना व त्यांचा मदतनीस जॉन गोयल आणि सईद खान हे रंगरंगोटीचे काम करीत आहे. संपूर्ण पूल त्यांनी रंगवून टाकला आहे. गुलाबी आणि लाल रंगाने पूलाची रंगरंगोटी केल्याने पूलाचे रुपडे पालटले आहे. यापूढेही असे काम करण्याचा मानस बिना यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणsocial workerसमाजसेवकthaneठाणेSchoolशाळा