शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बेकायदा शस्त्रप्रकरणी तपास यंत्रणेवर थेट दिल्लीहून दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:41 AM

डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णीच्या प्रकरणात तपासयंत्रणेवर थेट दिल्लीतून दबाव आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

कल्याण : बेकायदा शस्त्रांची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णीच्या प्रकरणात तपासयंत्रणेवर थेट दिल्लीतून दबाव आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचा दावा गुन्हे शाखेचे अधिकारी करत असले, तरी आतापर्यंतच्या तपासात काय उघड झाले, याबाबत मात्र त्यांना काहीही सांगता न आल्याने राजकीय दबावाच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.मानपाडा रोड परिसरातील ‘तपस्या हाउस ऑफ फॅशन’ नावाच्या दुकानात शस्त्रांचा साठा करून तो विकणाऱ्या कुलकर्णीला १४ जानेवारी रोजी कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चॉपर, तलवारी, कुकरी, गुप्ती, सुरे, कु-हाडी, कोयता, एअरगन, बटणचाकू, फायटरसह एक लाख ८६ हजार रुपयांचा १७० शस्त्रांचा साठा आढळला.कुलकर्णी हा भाजपाचा पदाधिकारी, तसेच संघाचा कार्यकर्ता असल्याने, या प्रकरणात अटकेपासूनच पोलिसांवर राजकीय दबाव होता, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एवढा मोठ्या प्रमाणात बेकायदा शस्त्रसाठा मिळूनही कुलकर्णीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे कुलकर्णीने शस्त्रे कुठून आणली, आतापर्यंत कोणाकोणाला विकली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहिली.प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणी ऊहापोह झाल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयाकडे धाव घेतली. त्यावर शनिवारी सुनावणी झाली आणि कुलकर्णीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तपास पुढे सरकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाल्याचे दिसत नाही. राजकीय दबावामुळे पोलिसांच्या तपासावरच पाणी फिरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आरोपीची कोठडी मिळूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागू नये, यासाठी पोलिसांवर थेट दिल्लीहून दबाव आल्याचे बोलले जात आहे.>कोठडीची मुदत आज संपणारकुलकर्णीच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने, त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणेकडून पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी किंवा लगेच जामीनही मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलिसांकडून खंडणकल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांवर दबाव असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. कुलकर्णीची चौकशी सुरू असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. मात्र, आतापर्यंतच्या तपासातून काय उघड झाले, याबाबत त्यांनी मौन बाळगले.