लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस असल्याची बतावणी करीत २५ ते ३० वयोगटातील एका त्रिकुटाने वृद्ध महिलेचे एक लाख आठ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारी खारेगाव येथे घडली. याप्रकणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळव्यातील खारेगाव येथे राहणारी ही ६७ वर्षीय महिला दत्तवाडीकडून सया पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोसायटीच्या समोर तीन भामटयांपैकी एकाने आम्ही पोलीस असून पुढे चौकशी सुरु असल्याची बतावणी केली. त्याचवेळी तिच्याकडील ६३ हजारांच्या सोन्याच्या दोन पाटल्या आणि ४५ हजारांची सोन्याची माळ हे दागिने पिशवित ठेवतो, असे सांगून तिच्याकडून दागिने घेतले. ते पिशवीत न ठेवता तोतयेगिरी करुन ते लंपास करुन तिथून त्यांनी पलायन केले. पोलीस उपनिरीक्षक यु. बी. मुंडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करीत त्रिकुटाने लांबविले एक लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 8:47 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पोलीस असल्याची बतावणी करीत २५ ते ३० वयोगटातील एका त्रिकुटाने वृद्ध महिलेचे एक लाख ...
ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा