ठाणे : कोरोनाची दुसरी लाट रोखा, कोरोनाचा समूळ नायनाट करा, अशा शब्दांत मंगळवारी हनुमान जयंतीदिनी भाविकांनी मारुतीरायाला साकडे घातले. ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरीतील हनुमान मंदिरात पहाटेच्या सुमारास कोविड नियमांचे पालन करीत पुरोहित महेश देवधर यांच्याकरवी यथासांग पूजा-अर्चा करून साधेपणाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर, दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागल्याने राज्य शासनाने साथ प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. सर्व धार्मिक- सामाजिक उत्सवांवर निर्बंध घातले आहे. दैनंदिन पूजाअर्चा वगळता मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ परंपरेचे जतन व्हावे यासाठी मंगळवारी (दि.२७ एप्रिल) भल्या पहाटेच ठाणे पूर्वेतील पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी मंदिर व्यवस्थापनाने मंदिर सजावटीसह परिसरात साफसफाई व जंतुनाशक फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपली. भाविकांनीही कोविड नियमावलीचे पालन करीत कोरोनाच्या भयानक साथीचे संकट लवकर टळू दे,असे साकडे हनुमानाच्या चरणी घातले.
.......
वाचली