शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

By admin | Published: June 24, 2017 12:33 AM

नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे. पण नेवाळीला विमानतळ करण्याची मागणी पुढे आली आणि गेल्या तीन वर्षांत त्या जागेभोवती जे भव्य प्रकल्प उभे राहिले. त्यातून जमिनीला सोन्याहून अधिक भाव आला आणि हे आंदोलन भडकत गेले. ब्रिटिशांच्या काळातील लाभार्थी आणि आता ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्यांना मिळणारा गडगंज पैसा यातून असंतोष खदखदत गेला. त्याला बिल्डरांनी, राजकारण्यांनी खतपाणी घातले आणि त्याची परिणती हिंसक आंदोलनात झाल्याचे गावकऱ्यांशी बोलल्यानंतर जाणवले. राज्य सरकारने २०१५ साली २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. त्यासाठी एक हजार ८९ हेक्टर जागा घेतली जाणार आहे. त्यासाठी एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे ग्रोथ सेंटर भव्य गृहसंकुलांमध्ये आहे आणि आंदोलन झालेली त्याला लागून आहेत. भाल, द्वारली ही गावे कल्याण तालुक्यातील आहेत. ही गावे नेवाळी एरोड्रमच्या जागेत बाधित झालेली आहेत. नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली, खोणी, वसार, माणेरा, तीसगाव, आडिवली, वडवली, धामटण ही अंबरनाथ तालुक्यातील गावे एरोड्रमच्या जागेने बाधित आहेत. या गावांना लागून आणखी काही बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. खोणी-तळोजा मार्ग हा तळोजा एमआयडीसीकडे जातो. हा मार्ग तळोजा-डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसीला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरही बिल्डरांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अंबरनाथ-पाले गावातही गृहप्रकल्प सुरु आहेत. तसेच उल्हासनगर गायकवाड पाडामार्गे अंबरनाथ-शीळ रस्त्यावर काही गृहप्रकल्प सुरु आहेत. याशिवाय कल्याण चक्की नाका ते मलंगगड रोडवर नांदिवली, द्वारली, भाल या भागात रस्त्यालगत चार ते आठ मजली इमारती उभ्या आहेत. या इमारती कुणाच्या परानगीने इतक्या उंच झाल्या, हे कोणी सांगायला तयार नाही. त्या बेकायदा आहेत, का याची शहानिशा कधी महसूल खात्याने केली नाही. हे क्षेत्र एमएमआरडीएच्या अखत्यारीत येते. त्यांनीही या बांधकामांना परवानगी दिलेली नाही. त्यामुले आपल्याभोवती हा सगळा ‘विकास’ होत असताना आपल्या जमिनी गुंतून पडल्या आणि आपण कोरडेच राहिल्याची तीव्र भावना नेवाळी विमानतळासाठी जमिनी गेलेल्या ग्रामस्थांत आहे. संबंधित वृत्त/पान २