लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळ्याचे दोन महिने संपले असताना, ठाणे शहरात पालेभाज्यांचे दर जैसे थे आहेत. मात्र, पालेभाज्यांचे दर उन्हाळ्यात वाढले होते. परंतु, पावसाळा सुरू झाल्यावर ते १० रुपयांनी उतरले आहेत. पावसाळ्यादरम्यान दरामध्ये मात्र चढ-उतार नसल्याचे पालेभाज्या विक्रेत्यांनी सांगितले.
१) पालेभाज्यांचे भाव (प्रति जुडी)
मेथी - ४० ते ५० रुपये
पालक - २० रु.
शेपू - २० रु.
कोथिंबिर - ४० - ५० रु.
पुदिना - २० रु.
कांद्याची पात - २० - ७० रु.
मुळा - २० रु.
लाल माठ - २० रु.
चवळी - २० ते २५ रु.
२) पालेभाज्यांची नाशिक आणि पुणे येथून आवक होत असते. थेट तिथून येणारा माल बाजारपेठेत उतरवला जातो, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
३) पावसाळ्यात पालेभाज्यांचे दर उतरले आहेत.
पावसाळ्याआधी जास्त दर होते, आता पालेभाज्यांची आवक वाढली असल्याने दर १० रुपयांनी कमी झाले आहेत.
- संभाजी खेडेकर, भाजी विक्रेते
पावसाळ्यापासून जे आहे तेच पालेभाज्यांचे दर आहेत. पावसाळ्याआधी भाजीपाला जास्त महाग होता.
- निरंजन ढगे, भाजी विक्रेते
४) पावसाळ्यात पालेभाज्यांचे दर कमी आहेत. त्यात श्रावण असल्याने पालेभाजी खरेदी करतो.
- रजनी शिंदे
श्रावणामुळे पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. उन्हाळ्याच्या तुलनेत आताचे दर कमी आहेत.
- विद्द्या पाटील