ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाºयांना घरे देण्याबरोबरच मध्यम गटासाठीसुध्दा कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. ठाणे महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या योजनेला वेग देण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले आहेत. त्यानुसार दुसºया टप्यात ३ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. याअंतर्गत ठाणे महापालिकेच्या शासन मालकी जागेवर बेतवडे सर्व्हे नं. १५, बेतवडे सर्व्हे नं. ७८, डवले गाव व म्हार्ताडी या ४ डीपीआरला तसेच याअंतर्गत ३ हजार सदनिका निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. राज्यशासनाकडून महापालिकेस प्राप्त झालेल्या जागेवर या योजना राबविण्यासाठी पीपीपी तत्वावर निविदा काढणे, खाजगी जागेवर भागीदारीद्वारे परवडणारी घरे बांधण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविणे आणि या योजनेतील चतुर्थ घटकामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वयक्तीक स्वरुपात घरकुल बांधण्यास व विस्तारीकरण करण्यास अनुदान प्राप्त होण्यासाठी ठाणे महानगरपालिका अधिकारी व ठामपा सन्माननीय सदस्य यांकरीता मार्गदर्शनार्थ कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. दुसºया टप्यात सुध्दा तीन लाखांची अट ठेवण्यात आली आहे. तीन लाखांचे ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल त्यांच्यासाठी ही घरे मोफत असणार आहेत. तर भागीदारी स्वरुपात परडवणारी घरे सुध्दा उभारली जाणार आहेत. यापुढेही जाऊन येथे वाढीव एफएसआय उपलब्ध होणार असल्याने जो विकासक लाभार्थ्यांची आणि परवडणारी घरे उभारणार आहेत, त्यांना कर्मशीअल घरे उभारण्याची संधी सुध्दा पालिका उपलब्ध करुन देणार आहे. परवडणारी घरे ज्यांना घ्यावयाची असतील त्यांच्यासाठी तीन लाखांची अट असणार नाही. परंतु ही घरे त्यांना १२ ते १५ लाखात उपलब्ध होणार असून लाभार्थ्यांची आणि परवडणाºया घरांचे आकारमान हे ३२५ चौरस फुटांचे असणार आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यातील बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ हजार घरे बांधणार आहे. यासाठी खाजगी विकासकांची मदत घेऊन पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार आहेत.
दिव्यातील बेतवडे येथे पालिका उभारणार प्रधानमंत्री आवास योजनेतून ३ हजार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:42 PM
ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाºयांना घरे देण्याबरोबरच मध्यम गटासाठीसुध्दा कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये घरे उपलब्ध होणार ...
ठळक मुद्दे३२५ चौरस फुटांचे मिळणार घरपरवडणारी घरेसुध्दा बांधली जाणार