ठाणे : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात हातभट्टीची दारू पाडण्याच्या ठिकाणी येऊर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून संबंधितास रंगेहाथ पकडले. त्याच्यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनकायद्याखाली गुन्हा दाखल केला.येऊर जंगलाच्या नागलाबंदर परिसरातील ससूनवघर येथील राखीव वनक्षेत्रातील ईदळीचा नाला येथे दारू गाळताना खोलांडे, ता. वसई येथील कमलाकर माळी (४१) यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २० लीटर गावठी दारू ताब्यात घेऊन त्याच्यावर वनकायद्याखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ वनाधिकारी रमाकांत मोरे यांनी कारवाई केली. याशिवाय, तेथील दारूच्या ड्रमसह कच्चा माल नष्ट करून ही दारू हस्तगत केली.घनदाट झाडीत तो गावठीचा पोटला वाहतूक करताना आढळून आल्याने वनाधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून त्यास अटक करून दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून त्याच्यावर अवैधरीत्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीअंतर्गत दारूभट्टी लावून वन्यजीवांच्या अधिवासास धोका पोहोचवणे, जंगलामध्ये आग पेटवणे तसेच राष्ट्रीय उद्यानात अधिसूचना क्षेत्रामध्ये रासायनिक पदार्थांचा वापर करून अवैधरीत्या गावठी दारू तयार करण्याच्या कारणाखाली गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक तपास वनाधिकाºयांकडून केला जात आहे.
वनविभागाचा येऊरच्या जंगलात दारूभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:58 PM