मीरा रोड - झोपडपट्टीत अत्यंत घाणेरड्या जागेत पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणा-या बेकायदा कारखान्याचे उत्पादन अन्न व औषध प्रशासनाने बंद केले आहे. पु-या बनवणारे कामगारही गलिच्छ होते. या अशा परिस्थितीत पु-या बनवल्या जात असल्याचे पाहून अन्नसुरक्षा अधिकारीही थक्क झाले.भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवलनगर भागातील आनंदनगरमध्ये सुनील चौहान हा पाणीपुरीसाठी लागणाºया पुºया बनवण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी सुनीलकडे पुºया बनवण्यासाठीचा आवश्यक असलेला परवानाच नसल्याचे उघड झाले.याठिकाणी गलिच्छ अवस्थेत पाच कामगार पीठ मळण्यापासून पुºया तळणे, पॅकिंग आदी कामे करत होते. या कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. कारखान्याच्या आजूबाजूला तुंबलेले नाले व त्यात डुकरे आदी फिरत होते. कारखान्यातसुद्धा अत्यंत घाण होती. जमिनीवरच पुºया लाटल्या जात होत्या. तेलही अत्यंत काळे होते.महापालिकेच्या अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी या कारखान्यास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिलिंडरचा असलेला साठाही बेकायदा असण्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या साठ्यामुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.उत्पादन बंद करण्याचे आदेश : या गलिच्छ ठिकाणी पाणीपुरीच्या पुºया बनवून त्यांची सर्वत्र विक्री केली जात होती. या ठिकाणी आता पुºयांचे उत्पादन-विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत, असे माणिक जाधव म्हणाले.
पाणीपुरीच्या कारखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:00 AM