शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

विद्यार्थ्यांना नेऊन जाणारी खासगी बस दुर्गाडी पुलावर उलटली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 10:34 PM

अज्ञात वाहनाने बसला कट मारल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याण : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटल्याची घटना रविवारी रात्री 9 च्या सुमारास दुर्गाडी पुलावर घडली. एका अज्ञात वाहनाने बसला कट मारल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.

 वज्रेश्वरीला सहलीसाठी गेलेल्या अंबरनाथमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ही बस असल्याचे समजते. या बसमध्ये सुमारे 25 विद्यार्थी होते. त्यापैकी 2 जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघात घडताच पोलीस आणि स्थानिकांनी आतल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अपघातामुळे कोनकडून कल्याणकडे येणाऱ्या मार्गावर आणि दुर्गाडी चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करून रस्ता मोकळा केला.

टॅग्स :Accidentअपघातkalyanकल्याण