शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

ठाण्यात खासगी बसना दणका

By admin | Published: March 19, 2016 12:45 AM

ठाण्यात राजकीय नेत्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने बेकायदा सुरू असलेल्या खासगी बसच्या क्लीनरने प्रवाशाला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या मुजोरीविषयी

ठाणे : ठाण्यात राजकीय नेत्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने बेकायदा सुरू असलेल्या खासगी बसच्या क्लीनरने प्रवाशाला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या मुजोरीविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग्या झालेल्या वाहतूक पोलिसांनी या खासगी बसच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. शुक्रवारी या बसवर कारवाईचा बडगा उगारून दिवसभरात तब्बल ५४ बसवर कारवाई केली. यामुळे गाळण उडालेल्या चालकांनी पुढील कारवाईच्या भीतीने इतर बस रस्त्यावर उतरवल्या नाहीत. या कारवाईमुळे घोडबंदर मार्गावरील परिवहन सेवा, एसटीच्या बस मात्र दिवसभर गच्च भरून धावत होत्या. तसेच एरव्ही शहरातील प्रमुख नाक्यांवर रोज जागोजागी निर्माण होणारे अडथळे मात्र खासगी बस बंद ठेवल्यामुळे निर्माण न झाल्याने शहरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. ठाण्याचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी शहरात बेकायदा सुरू असलेली खासगी बसची वाहतूक बंद केली होती. पण त्यांची बदली होताच हे वाहतुकदार मोकाट सुटले. ठाणे आरटीओने या बस पुन्हा रस्त्यावर दिसल्या तर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण तोही फोल ठरला. अशाच एका बेकायदा बसमधून प्रवास करणाऱ्या शुक्र ाम तायडे या प्रवाशाला झालेल्या मारहाणीमुळे आरटीओ, पोलिसांचे बिंग फुटले. त्यांच्यावर टीकेची झोड उठताच पुन्हा कारवाई सुरू झाली. मात्र अनेक राजकीय नेत्यांच्याच मालकीच्या या बस असल्याने कारवाई किती काळ सुरू राहते, यावर सर्वांचे लक्ष आहे.आरटीओ करणार परमिट रद्द करण्याची शिफारसठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ मार्च ते आतापर्यंत १८ बसवर कारवाई करून त्यातील ६ बस जप्त केल्या आहेत. शिवाय, त्यांच्याकडून ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. यापुढेही जाऊन या बसचालकांकडून तिसऱ्यांदा अशी चूक झाली तर त्यांचे परमिट रद्द करण्याची शिफारस प्राधिकरणाकडे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.परिवहन सेवांना लॉटरी वाहतूक पोलिसांनी खासगी बसवर केलेल्या कारवाईमुळे घोडबंदर मार्गावर धावणाऱ्या ठाणे परिवहन सेवा, बेस्ट, वसई-विरार महापालिका, मीरा-भार्इंदर महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि एसटीच्या बस गच्च भरून धावत होत्या. शिवाय, शेअर रिक्षाचालकांचीही या कारवाईमुळे चांदी झाली होती. ठाणे परिवहन सेवेने नॉन-पिक-अवरच्या वेळेत ठाणे स्टेशनवर दुसऱ्या मार्गावरील बस घोडबंदर मार्गावर वळवल्या होत्या. नाकाबंदीसाठी पोलीस तैनात ठाणे ते घोडबंदर या मार्गावर खासगी बसची नाकेबंदी करण्यासाठी सकाळपासूनच वाहतूक पोलिसांनी पथके तैनात केली होती. या पथकांनी सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल ५४ बसवर कारवाई केली. यामुळे खासगी बसमालक धास्तावल्याने त्यांनी आपली ही सेवा बंद ठेवल्याचे चित्र शुक्र वारी दिसून आले.